घरताज्या घडामोडीऔषधोपचार महागले तरी, एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मिळतेय बिलांची तुटपूंजी रक्कम

औषधोपचार महागले तरी, एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मिळतेय बिलांची तुटपूंजी रक्कम

Subscribe

सध्या राज्यभरात औषधोपचार मोठ्या प्रमाणात महागला आहे. महिन्यातील वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक स्थिती बिकट होत आहे. असे असताना एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अद्याप 1997च्या दरपत्रकाप्रमाणे वैद्यकीय खर्चासाठी रक्कम देण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या राज्यभरात औषधोपचार मोठ्या प्रमाणात महागला आहे. महिन्यातील वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक स्थिती बिकट होत आहे. असे असताना एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अद्याप 1997च्या दरपत्रकाप्रमाणे वैद्यकीय खर्चासाठी रक्कम देण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम ही एकूण वैद्यकीय खर्चाच्या 10 ते 15 टक्केच असते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (As Per 1997 St Employees Getting Medical Bill Amount From MSRTC Corporation)

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ आर्थिक तोटा सहन करत आहे. परिणामी याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. कारण एसटी महामंडळावर आर्थिक संकट असल्याने कर्मचाऱ्यांना पगार आणि भत्ते देणे महामंडळाला कठीण जाते. त्याशिवाय, दरमहा पगार हा कमी असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे पगार कमी असल्याने आजारी पडल्यावर त्या आजारावरील उपचाराचा खर्चही अनेकदा कर्मचाऱ्यांना परवडत नसल्याचे समजते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांना एखादा दुर्धर आजार बळावल्यास कर्ज काढून बिल चुकते करावे लागते. दरम्यान, प्रवाशांना स्वस्त दरात आणि सोयीची वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी महामंडळामध्ये सध्या जवळपास 90 हजार कर्मचारी काम करत आहेत. या 90 हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 38 हजार चालक, 34 हजार वाहक आणि 16 हजार यांत्रिक आहेत.

या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. याआधी मे महिन्यात शेवटची संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इम्रान खान यांच्या हत्येचा कट पंतप्रधान शाहबाज यांनी रचला; खान यांच्या सल्लागाराचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -