घरमहाराष्ट्ररामदास कदमांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले म्हणून अन्यथा..., ठाकरे गटाची जोरदार टीका

रामदास कदमांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले म्हणून अन्यथा…, ठाकरे गटाची जोरदार टीका

Subscribe

मुंबई : लोकसभेच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावरून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम हे एकमेकांना भिडले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. आता तर वैयक्तिक पातळीवर हल्ले केले जात आहेत. यावर आता ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा खुलास करत रामदास कदम यांच्या दाव्यातील हवाच काढली आहे.

हेही वाचा – कदम-कीर्तिकरांच्या वादाने ओलांडल्या सर्व मर्यादा; गजाभाऊंच्या बायकोचाही उल्लेख

- Advertisement -

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. मात्र, आजारपणामुळे कीर्तिकर निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यावरूनच आता गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात गद्दार, बेईमान असा उल्लेख करत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

रामदास कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्यासमवेत खेड ते पुणे प्रवास केल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला. तर, नारायण राणे पक्ष सोडून गेला तेव्हा मी एकटा लढत होतो, कीर्तिकर यांच्यासारखे नेते शेपट्या घालून बसली होती. कोणाची बाहेर पडण्याची हिम्मत नव्हती. पण हा रामदास कदम एकटा डोक्याला कफन बांधून फिरला, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी कीर्तिकर यांच्यावर केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणजे ते बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत होते, कदम-कीर्तिकर वादावर अनिल परबांची प्रतिक्रिया

या सर्व वादावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार अनिल परब यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला माहीत नसलेल्या गोष्टी हे लोक बाहेर काढत आहेत. पण आम्ही शिवसैनिक असल्याने आम्हाला तर सर्वच गोष्टी माहीत आहेत. रामदास कदम यांनी शरद पवार यांच्या गाडीतून कसा प्रवास केला, हे कीर्तिकर यांनी सांगितले. पण नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांचेही नाव त्या यादीत होते. विरोधी पक्षनेते झाल्यामुळे हे येथे थांबले. अन्यथा ते सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्याच्या तयारीत होते, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे. त्यांच्या निष्ठेचे किस्से ऐकलेले आहेत, बऱ्याचदा पडताळून बघितलेले आहेत. तेव्हा निष्ठा वगैरे त्यांनी कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -