मागण्या मान्य; लाँग मार्चमधील शेतकरी पुन्हा वासिंदहून घराकडे रवाना

विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून वासिंद येथे थांबलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर मोर्च्या थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. मागण्या मान्य झाल्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शनिवारी स्वतः जाऊन दिल्यानंतर लॉंग मार्चमधील शेतकरी मोर्चा थांबवून आपापल्या घरी परत निघून गेले.