Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम स्वयंपाक तयार नसल्याने नवरा पिसाळला, बॅटच्या एका फटक्यात बायकोचा जीव घेतला

स्वयंपाक तयार नसल्याने नवरा पिसाळला, बॅटच्या एका फटक्यात बायकोचा जीव घेतला

बॅटीच्या एका फटक्यातच पत्नी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली.

Related Story

- Advertisement -

पती पत्नीचा वाद काही नवीन नाहीत. त्यांच्यात वाद होतात मात्र काही किरकोळ वाद गुन्ह्याचे स्वरुप धारण करतात. असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. पती पत्नीमधील किरकोळ वाद झाले. पतीने संतप्त होऊन पत्नीला बॅटने मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला बॅटचा जोरदार फटका बसला. पत्नी रक्तबंबाळ होऊन कोसळली. तिला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी संतप्त पतीला ताब्यात घेतले आहे.

कोमल जाधव आणि राहुल जाधव असे या दाम्पत्याचे नाव आहे. पती राहुल व्यसनी होता. दोघेही सांगली जिल्ह्यातील कुपवाड भागातील अहिल्यानगर झोपडपट्टीत राहत होते. त्या दिवशी आरोपी पती राहुल हा दारुच्या नशेत घरी आला. घरी आल्यावर त्याला भुक लागली. जेवण तयार झाले नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. स्वयंपाक का केला नाहीस,मला भूक लागली आहे, असे म्हणत संतप्त पतीने दारुच्या नशेत पत्नी कोमल हीला जबरदस्त मारहाण केली. तिला शिवीगाळ करत हातातील बॅट जोरात कोमलच्या डोक्यात घातली. बॅटीच्या एका फटक्यातच पत्नी कोमल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली.

- Advertisement -

रक्ताने माखलेल्या कोमलने नवरा राहुलच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. मात्र बॅटचा मार इतक्या जोरात बसला होती की उपचारांदरम्यान कोमलचा मृत्यू झाला. कुपाड पोलिसांनी आरोपी पती राहुल याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे


हेही वाचा – मास्क विचारला म्हणून पोलिसांवरच सोडला कुत्रा, दादागिरी आली अंगलट

- Advertisement -

 

- Advertisement -