घरउत्तर महाराष्ट्रगद्दारांच्या रूपाने दगड गेले आणि 'हिरे' सापडले : उद्धव ठाकरे

गद्दारांच्या रूपाने दगड गेले आणि ‘हिरे’ सापडले : उद्धव ठाकरे

Subscribe

नाशिक : शिंदे गटाने ठाकरे गटाला एकापाठोपाठ दणके दिल्यानंतर आता ठाकरे गटानेही पलटवार केला आहे. शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मालेगावातील नेते अद्वेय हिरे यांना शिवबंधन बांधले. यावेळी बोलतांना उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टोला लगावला. एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की, बरे झाले गद्दार गेले.

त्यांच्यामुळे हिरे सापडले. आजवर त्यांना आम्ही खूप पैलू पाडले आणि हिरा म्हणून आम्ही त्यांना नाचवत होतो. पण ते दगड होते, ते गेले बुडाले.’’ असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच सर्वे 35 जागा सांगत आहे पण मी म्हणतो की, लोकसभेला महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील.’असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.
भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने मालेगावमध्ये पुन्हा एकदा भुसे आणि हिरे यांच्यातील सामना रंगणार आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर अद्वय हिरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 2009 पासून भारतीय जनता पक्षासोबत काम करतो आहे, गोपीनाथ मुंढे साहेबानी विनंती केल्यानंतर पक्षात प्रवेश केला. मी ज्यावेळी पक्ष प्रवेश करत होतो, त्यावेळी भाजप पक्षातील सर्व पदाधिकारी भाजप सोडून जात होते.तेव्हा राजकारणात सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत अमृतभाई पटेल यांना पाडून आम्ही भाजपा भक्कम केल्याची आठवण अद्वय हिरे यांनी सांगितली. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे. अद्वय हिरे हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत आले. हिरे कुटुंबाचा इतिहास, शिक्षण संस्थांची ताकद आणि विविध सामाजिक उपक्रमात असणारा पुढाकार दादा भूसेंसारख्या मुरब्बी राजकारण्याविरोधात काय रणनीती आखणार त्यांच्या वाटेत किती आव्हाने उभे करणार हे यावरच अद्वय हिरे यांची पुढची राजकीय वाटचाल आणि ठाकरे गटाचे मालेगावमधील भवितव्य अवलंबूबन आहे.

- Advertisement -
‘संकटात साथ देताय हे महत्त्वाचं- संजय राऊत’

अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावले पुढे चालेल. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केलात, याला जास्त महत्त्व असल्याचे संजय राऊत म्हणाले. आजच्या संकटात शिवसेनेचा तुम्ही हात पकडलाय, तो तुम्ही पकडा आणि आम्ही सोडणार नाहीत, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांचे स्वागत केले.

कालपासून प्रदेशाध्यक्षांपासून भाजपचे फोन

मी ठाकरे गटात प्रवेश करणार म्हटल्यावर कालपासून मला असंख्य भाजप नेत्यांचे फोन सुरु झाले, असे वक्तव्य अद्वय हिरे यांनी पक्ष प्रवेशावेळी केले ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षांपासून असंख्य लोकांनी फोन केले. पण मी म्हटले कितीही खोके दिले तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही. मीच नाही तर संबंध उत्तर महाराष्ट्र शिवसेना कशी उभी राहिल, यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू. येत्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांना बसवल्याशिवाय हा कार्यकर्ता थांबणार नाही, असे आश्वासन अद्वय हिरे यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -