घरताज्या घडामोडीतुम्ही चुकीचा निर्णय घेतला अन् लोक रस्त्यावर उतरले, असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर...

तुम्ही चुकीचा निर्णय घेतला अन् लोक रस्त्यावर उतरले, असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर टीका

Subscribe

मागील दीड वर्षांपासून चीनने भारतात घुसखोरी केली आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवाद वाढवत आहे. काश्मिरमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडितांवर हल्ले वाढत आहेत. अग्निपथ योजनेवरून तरूणांमध्ये प्रचंड संताप आहे. देशाच्या समोर आव्हाने आहेत. आपला आपला संताप व्यक्त करण्यासाठी तरुणांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्याला जबाबदार कोण आहे? केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला अन् लोक रस्त्यावर उतरले आहेत, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशातील वास्तवाच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे. भारतातील एक मोठा वर्ग भीतीखाली जगत आहे. प्रयागराजमध्ये लोकांची घरे तोडण्यात आली आहेत. भाजपच्या एका नेत्याने लोकांना चिरडलं. त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आम्ही तर नेहमीच हिंसेला विरोध केला आहे. तुम्ही चुकीचा निर्णय घेतल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. त्याला जबाबदार पंतप्रधान आहेत, असं ओवैसी म्हणाले.

- Advertisement -

द्वेषाची मानसिकता असलेल्या लोकांनी हे कृत्य केलं असेल एवढंच मी वारंवार सांगत होतो. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, असं सांगतानाच हिंसा होऊ नये. भाजपसमोर आता काँग्रेस काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे ही अवस्था झाली आहे, काँग्रेस यावर काहीही बोलली नाही. हा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि देशाच्या अनेक राज्यात हिंसा भडकली आहे, असं ओवैसी म्हणाले.


हेही वाचा : तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -