राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा MIM कार्यकर्त्यांसाठी फतवा

Asaduddin Owaisi order for MIM activists Don't gave reaction about Raj Thackerays statement
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा MIM कार्यकर्त्यांसाठी फतवा

एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बोलू नका असा फतवा काढला आहे. राज ठकारेंनी गुढी पाडवा मेळाव्यात अझानवरुन निशाणा साधला आहे. मस्जिदीवरुन भोंगे काढा नाहीतर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावर कोणतेही वक्तव्य करु नका असे फर्मान असदुद्दीन ओवैसी यांनी दिले असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ नका असा फतवाच राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिला असल्याचे सांगितले आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असा फतवा औरंगाबादेतून काढण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी जे काही भाषण केले आणि जी काही भूमिका स्पष्ट केली आहे. याविरोधात माध्यमांकडून एमआयएमची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देण्यात येत नाही आहेत. इम्तियाज जलील यांची आणि एमआयएमची काय भूमिका आहे याबाबत जलील यांना प्रश्न केला होता. परंतु त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. तसेच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा बोलण्यास नकार दिला आहे. यामुळे असदुद्दीन यांची काय भूमिका आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवरुन हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. घाटकोपरमध्ये मशिदीसमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली आहे.

प्रार्थना करण्यासाठी माझा विरोध नाही. प्रत्येक धर्मात प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी त्या प्रार्थनेचा इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भाषणामुळे बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया