Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली

Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2021) निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यासाठी सोमवारी दुपारी पंढरपूरकडे रवाना झाले होते. आज पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा संपन्न झाली. मोजके वारकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा करण्यासाठी केशव कोलते आणि पत्नी इंदूबाई कोलते यांना मान मिळाला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा करण्यात आली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान कोलते दाम्पत्याला मिळाला. केशव शिवदास कोलते (वय ७१) आणि इंदुबाई केशव कोलते (वय ६०) या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या समवेत आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाची महापूजा केली. गेल्या २० वर्षापासून कोलते यांनी विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः ट्विट करून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्याची माहिती दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला, मी भाग्यवान आहे. विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन लाखो भाविक परतत आहेत. मी मोठं असं काहीही केलं नाही. गजबजलेले पंढरपूर आनंदाची उधळण असते, आम्हाला असे वातावरण पाहिजे. लवकरात लवकर असे वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो.’

तसेच विठ्ठल-रखुमाई यांच्या महापूजेचा मान मिळालेले कोलते म्हणाले की, ‘१९७२ सालापासून वारी करत आहेत. २००० साली पंढपूरला आलो. २० वर्षांपासून विठ्ठल मंदिरात विणेकर म्हणून सेवा करत आहे. महापूजेच्या निमित्ताने त्या सेवेचं फळ त्यांना मिळालं आहे. आज कष्टाचं फळ मिळालं आहे. कोरोना व्हायरस नष्ट व्हावा, असं पांडुरंगाकडे मागणं करतो.’

विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजेचा व्हिडिओ (सौजन्य – सह्याद्री)

- Advertisement -