Ashadhi Ekadashi : यंदा पंढपूरच्या विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना

गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली. यानंतर यंदा या महापूजेचा मान कोणाला मिळणार यावरून तर्कवितर्क लढविले जात होते

Ashadhi Ekadashi 2022 wari eknath shinde will do pandharpur pooja ashadhi ekadashi

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती जाण्याची शक्यता होती. मात्र हे सर्व राजकीय अंदाज आज फोल ठरले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली, यावेळी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा केली, या घोषणेमुळे आता यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार याचे निश्चित उत्तर आज मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातूनच यंदा विठ्ठलाची महापूजा होणार हे स्पष्ट आहे.

यंदा जवळपास दोन वर्षांनंतर आषाढी वाराची सोहळा मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. तर पायी प्रवास करुन जाणाऱ्या पालख्या 9 जुलैला पंढरपूरला पोहचतील. यानंतर पुंढरपुरात 10 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 पासून गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली. यानंतर यंदा या महापूजेचा मान कोणाला मिळणार यावरून तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र फडणवीसांच्या घोषणेनंतर यंदा शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेंना मिळणार आहे. एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या महापूजेचा मान घेणार आहेत.

यंदा 10 जुलै 2022 रोजी (रविवारी) आषाढी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी दरवर्षी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा काही अपवाद वगळता अखंडपणे सुरु आहे. मात्र यंदा महापूजेला विठ्ठलाच्या दारी उद्धव ठाकरे येणार की देवेंद्र फडणवीस यावर चर्चा सुरु होत्या. यावरून सोशल मीडियावरही मिम्सचा पूर आला होता. मात्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध, पण तरीही सहमत- फडणवीस