घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा; विठ्ठल बडेंना पूजेचा मान

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा; विठ्ठल बडेंना पूजेचा मान

Subscribe

आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल - रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. तसेच यंदाचा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला.

जय जय विठ्ठल… जय हरि विठ्ठल… टाळ मृदुंगाच्या जयघोषात… आषाढी एकादशीचा सोहळा दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल – रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. तसेच यंदाचा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला.

आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंढरपूरमध्ये २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू

पंढरपूरमध्ये ३० जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. वारी काळात शहरात गर्दी होऊ नये, यासाठी अडीच दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू झाली आहे. पंढरपूरच्या शहर आणि परिसरातील १० किलोमीटर परिसरात हा नियम लागू झाला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -