घरमहाराष्ट्रAshadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना दिलासा; महिला आयोगाकडून...

Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना दिलासा; महिला आयोगाकडून हे निर्णय

Subscribe

यंदा आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

राज्यात कोरोनानंतर दोन वर्षांनंतर आषाढी यात्रा (Wari 2022) वारकऱ्यांसाठी सुरु होणार आहे. यामुळे यंदा वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या विक्रमी असणार आहे. तब्बल 40 टक्क्यांपर्यंत ही वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी असते. मात्र वारीदरम्यान (Ashadhi Wari 2022) अनेक महिला वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता राज्य महिला आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (State Women Commission)

महिला वारकाऱ्यांसाठी घेतलेले हे निर्णय

१) वारीदरम्यान दर दहा ते वीस कि.मी अंतरावर महिला वारकऱ्यांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी.

- Advertisement -

२) सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असावी.

३) वारीदरम्यान स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

- Advertisement -

४) महिला सुरक्षेसाठी मुक्कामांच्या ठिकाणी, मंदिर परिसरातील दर्शनी भागात महिला हेल्पलाईन क्रमांक लावावेत. अशा माहिती आयोगाने दिली आहे.

यंदा वारीसाठी येणाऱ्या महिला वारकऱ्यांना या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी पुणे, सोलापूर, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच देहू आणि आळंदी देवस्थानांच्या विश्वतांची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात आषाढी पालखीचा सोहळा पार पडणार आहे. यासंदर्भात आता पालखी मार्गाची पाहणी आवश्यकत्या सूचना दिल्या जात असल्याचे माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली. तसेच रस्त्यांची प्रलंबित कामं देखील 10 जूनपर्यंत पूर्ण करणार आहोत. याशिवाय पाणी, लाईटची व्यवस्था देखील करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यंदा आषाढी वारीसाठी संत तुकाराम (Sant Tukaram) महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात 329 दिंड्य़ा सहभागी होतील, ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहेत. पायी प्रवास करत ही पालखी 9 जुलैला पंढपूरमध्ये पोहचणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून 21 जूनला प्रस्थान करेल.


केंद्रीय यंत्रणांना कारवाईचा अधिकार पण गैरवापर होऊ नये, अजित पवारांची ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -