बीडच्या नवले दाम्पत्याला मिळाला विठुरायाच्या पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान

यावर्षी बीड जिल्ह्यातील वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी दाम्पत्याला या वर्षी विठुरायाच्या शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. विठुरायाच्या जयघोषात अवघी पंढरपूर नागरी दुमदुमून निघाली आहे.

EKnath SHindi pandharpur

गेले अनेक दिवस वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत होते ते आजच्या या मंगल दिनी सावळ्या विठूराला भेटण्यासाठी. आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भक्तीमय वातावरणात वैष्णवांचा मेळा जमला आहे. विठुरायाच्या दर्शनाने वारकऱ्यांमध्येही आनंद पसरला आहे. यावर्षी बीड जिल्ह्यातील वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी दाम्पत्याला या वर्षी विठुरायाच्या शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.

हे ही वाचा – ‘राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडं

आषाढी वारी सुरु झाल्यापासूनच महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची आस लागून राहिली होती आणि आज अखेर आषाढी एकादशीचा दिवस उजाडला. आज विठूरायाची पंढरपूर नगरी भाविकांच्या उत्सहाने आणि भक्तीने चैतन्यमय झाली आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूराची पूजा केली. त्यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिंदे कुटुंबाने आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शन घेऊन पूजा केली.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी दाम्पत्यासाठी आणखी एक म्हत्वाची बाब म्हणजे. यावर्षी बीड जिल्ह्यातील वारकरी श्री. मुरली भगवान नवले(५२) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले(४७) या वारकरी दाम्पत्याला या वर्षी विठुरायाच्या शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. या वारकरी दाम्पत्याने श्री विठ्ठल रक्मिणी यांची पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सद्स्य आणि लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.

दरम्यान कोव्हीडच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नव्हती पण या वर्षी आषाढी वारी पायी झाल्यामुळे वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांनी रिंगण, पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. यावर्षी १० लाखांपेक्षा जास्त वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले आहेत. विठुरायाच्या जयघोषात अवघी पंढरपूर नागरी दुमदुमून निघाली आहे.

हे ही वाचा – पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण; ५९ जणांचा मृत्यू