घरमहाराष्ट्रआषाढी वारी २०२२: तुकोबांच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा, आज सोलापुरात प्रवेश

आषाढी वारी २०२२: तुकोबांच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा, आज सोलापुरात प्रवेश

Subscribe

नीरा स्नान आटोपून तुकोबांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून या पालखीला भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

आषाढी वारी(ashadhi wari) सुरु झाल्यापासूनच सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर यंदाची वारी ही पायी होत असल्यामुळे वारकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. विठुरायाचं नाव घेत वारी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. आज सकाळी पुणे जिल्यातील शेवटचा तालुका इंदापूर मधील सराटी या गावातील मुक्काम घेतल्यानंतर संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. नीरा स्नानाचा हा सोहळा अतिशय भक्तीमय पद्धतीने पार पडला. अनेक भक्तगण या नीरा स्नान सोशल्याचे साक्षिदार झाले. नीरा स्नान आटोपून तुकोबांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून या पालखीला भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

आणखी वाचा – आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

- Advertisement -

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद…

vittal temple
विठ्ठल- मंदिर

ही वारी सुरु असतानाच पावसाने सुद्धा राज्यात सर्वत्र पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. त्यामुळे वारकरी सुद्धा विठूनामाच्या जयघोषासोबतच पावसात सुद्धा वारकरी चिंब झाले आणि विठुरायाच्या गजरात वारी पंढरपूच्या(pandharpur) दिशेने प्रस्थान करत आहे. आषाढी एकादशीला आता एवढे काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे पांडुरंगाला भेटण्यासाठी वारकरी सुद्धा मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने धाव घेत आहेत. वारकऱ्यांना सुद्धा आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. ९ जुलै रोजी वारी पंढरपूर नगरीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी पंढरपूर प्रशासनाने वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई केल्या आहेत. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्याचबरोबर प्रत्येक भाविकाला व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी सुद्धा सुविधा करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

आणखी वाचा – एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

आणखी वाचा – रक्षाबंधन 2022 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या शुभमुहूर्त

पंढरपुरात(pandharpur) आषाढी एकादशीच्या(ashadhi wari 2022) दिवशी विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर अशी काही स्थळं आहेत ज्यांना वारकर्यांनी भेट द्यावी. त्यात पुंडलिक मंदिर, लोहदंड तीर्थ, लखुबाई मंदिर आणि नामदेव पायरी ही काही स्थळं आहेत ज्यांना वारकऱ्यांनी भेट द्यावी. अशातच या आनंदाच्या आणि भक्तीमय वातावरणात वारी सोलापुरात दाखल झाली आहे.

 

 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -