Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आषाढी वारी २०२२: माऊलींच्या रिंगणाचा उत्साह पावसातही कायम, वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ

आषाढी वारी २०२२: माऊलींच्या रिंगणाचा उत्साह पावसातही कायम, वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ

Subscribe

गुरुवारी माऊलींची आणि सोपान देव यांची बंधूभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात अनेक वारकरी लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्येही दिसतो. आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. याच भक्तीमय वातावरणात खुडूस येथे माऊलींच्या पालखीचे रिंगण पार पडले. या रिंगण सोहळ्याला भक्तगण तर होतेच पण पावसाने सुद्धा या रिंगण सोहळयाला हजेरी लावली. पाऊस असूनही भाविकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. एकीकडे माउलींच्या पालखीचा रिंगण सोशल पार पडदा असताना दुसरीकडे तुकोबांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण पार पडले. तर गुरुवारी माऊलींची आणि सोपान देव यांची बंधूभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे. आता भाविकांना विठुरायांच्या भेटीची आस लागली आहे.

हे ही वाचा – आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद…

- Advertisement -

माऊलींच्या पालखीने माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खुडूस फाटा येतेच सकाळी पोहोचली. तिथल्या मैदानावर माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला. भव्य मैदानावर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हातात भगवी पताका, टाळ – मृदूंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. रिंगणाच्याच ठिकाणी माऊलींची पालखी विराजमान झाली आणि त्या नंतर माऊलींचे अश्व आले.

- Advertisement -

हे ही वाचा – आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

चोपदाराने इशारा करताच उपस्थित असलेल्या भक्तांनी विठूनामाच एकाच जयघोष केला. सावळ्या विठुरायाच्या जयजयकाराने संपूर्ण आसमंत दुमदुमून निघाले. त्या नंतर  अश्वाने गोल फेरी सुद्धा पूर्ण केली. रिंगण सोहळा झाल्यानंतर काही वेळ पावसाने सुद्धा हाजेरी लावली. त्यावेळी भक्तगण विठूनामाच्या जयघोषाप्रमाणेच पावसाहती चिंब झाले.

हे ही वाचा – गुरू पौर्णिमेला बनतोय तीन ग्रहांचा अद्भूत संयोग; ‘या’ ३ राशींना होणार फायदा

vitthal puja at pandharpur on the occasion of ashadhi ekadashi

तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने कळून येतेहून प्रस्थान करून पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडल्यांनंतर नगारखाना त्या नांतर पालखी आणि पाठोपाठ अश्व सुद्धा आले. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा रांगा लावल्या होत्या. पालखीला वंदन करून रिंगण सोहळा पूर्ण झाला. त्यावेळी भाविकांनीही खेळ खेळून मनमुराद आनंद लुटला. या नंतर पालखी बोरगाव येथे मुक्कामी पोहोचली.

हे ही वाचा – आषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार…

ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे रिंगण :

गुरुवारी पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तर माऊलींची पालखी वेळापूर येथून प्रस्थान करून ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे सोपानदेव यांची बंधूभेट घेऊन भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.

हे ही वाचा –  एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

मागील दोन वर्षांनंतर पायी वारे होत आहे त्यामुळे वारकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. वारीचा हाच आनंद सर्वत्र पसरला आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -