आषाढी वारी २०२२: विठ्ठल रुक्मिणीच्या भव्य प्रतिमा असलेल्या चित्ररथला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद

झी टॉकीजच्या या कल्पनेतून साकार झालेल्या या चित्ररथाला विठ्ठल भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल’ म्हणत अनेक भक्तगण वारीमध्ये सहभागी होतात. आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी वारीमध्ये सहभागाची होऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होत आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील आषाढी वारी हा सर्वव्यापी आनंद सोहळा आहे. मागील दोन वर्षांपासून वारी होऊ शकली नव्हती पण या वर्षी वारी पायी होत असल्याने वारकऱ्यांमध्येही आनंद पसरला आहे.

हे ही वाचा –  आषाढी वारी २०२२: माऊलींच्या रिंगणाचा उत्साह पावसातही कायम, वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ

वारकऱ्यांचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी झी टॉकीजने विठ्ठल रुक्मिणी यांची भव्य मूर्ती असलेला. आकर्षक चित्ररथ वारी जिथे मार्गक्रमण करत आहे त्या ठिकाणी नेण्यात आला आहे आणि यातूनच भक्तांना विठ्ठल आणि रुक्मिणीच्या अखंड दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. झी टॉकीजच्या या कल्पनेतून साकार झालेल्या या चित्ररथाला विठ्ठल भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा – आषाढी वारी २०२२: तुकोबांच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा, आज सोलापुरात प्रवेश

हे ही वाचा – आषाढी वारी २०२२ : आठवडाभर आधीच विठूरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरमध्ये, यंदा यात्रा…

पंढरपूरच्या सोहळ्याची आणि विठ्ठल दर्शनाची अनुभूती भाविकांना मिळावी या साठी झी टॉकीजने केलेल्या या अनोख्या उपक्रमाला भक्तांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. वारीच्या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणारा हा चित्ररथ आम्हाला साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्याची आठवण करून देतो, असे वारीतील भक्तांनी सांगितले. विठूरायाची ही मूर्ती १० फुटांची असून मूर्तीला पाहल्यावर साक्षात विठ्ठल समोर आहे असंच वाटतं. चित्ररथाला पाहून भक्तगण सुद्धा भावुक झाले.

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२ : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे इंदापुरात पहिले रिंगण पार पडले

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार…

ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे रिंगण :

दरम्यान काल गुरुवारी पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार होती . तर माऊलींची पालखी वेळापूर येथून प्रस्थान करून ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे सोपानदेव यांची बंधूभेट घेऊन भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.

हे ही वाचा –  नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…