घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयूपीएससी टॉपर अशिमा मित्तल जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

यूपीएससी टॉपर अशिमा मित्तल जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अशिमा मित्तल यांची नियुक्ती झाली आहे. मित्तल या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या. दरम्यान, नाशिकच्या प्रांत अधिकारी वरशा मीना यांचीही जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

१४ फेब्रुवारी 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर लीना बनसोड यांना कोरोनाशी सामना करावा लागला. या काळात ग्रामीण भागात आरोग्य विभागाने चांगले काम केले. पण औषध खरेदीचा मुद्दा राज्यभर गाजला. नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यात त्यांना यश मिळाले. परंतु स्वतः च्या शासकीय घरावर ३० लाखांचा त्यांनी खर्च केल्याचा मुद्दा वादाचा ठरला. एकंदरीत, गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्यांची कामगिरी संमिश्र अशीच राहिली. आता नवीन सीईओ मित्तल यांच्यासमोर आर्थिक नियोजनाचे प्रमुख आव्हान राहणार असून, अधिकाधिक निधी त्यांना खर्च करावा लागेल.

- Advertisement -
यूपीएससी टॉपर आहेत आशिमा मित्तल 

१९९२ साली जन्म झालेल्या ३० वर्षीय आशिमा मित्तल २०१८ सालच्या बॅचच्या अधिकारी आहेत, मूळच्या राजस्थानची राजधानी जयपूर येथील असलेल्या आशिमा यांनी अभियांत्रिकी करण्यासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता, यूपीएससी परीक्षेचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी खाजगी नोकरीही स्वीकारली होती. आयएएस मित्तल यांनी तीन वेळा परीक्षेचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ३२८वा रँक मिळवला, त्यावर समाधानी न राहता त्यांनी तिसरा प्रयत्न केला व तिसर्‍या प्रयत्नात देशात १२वा रँक मिळवला. आशिमा यांनी यूपीएससीची तयारी करत असताना मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील मिळवली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -