काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुखांनी थोपटले काकांविरोधात दंड

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. यावेळी निलंबनाची कारवाई झालेली असताना दुसरीकडे ते बाजार समितीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. अशातच त्यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. कारण हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे नरखेड बाजार समितीतील राष्ट्रवादीचे सभापती यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या मतदान होणार असून राष्ट्रवादीचा सभापती नरखेड APMCमधून गेलेला असेल, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात मोठ्या प्रमाणात संचालक मंडळामध्ये नाराजी होती. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी १८ पैकी ९ जण लागतात. हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याकरिता १२ जणांची गरज असते. आमच्या लोकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. त्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


हेही वाचा : HSC Result : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभाग अव्वल, सर्वाधिक कमी निकाल मुंबई विभागाचा