घरताज्या घडामोडीराजकीय स्वार्थासाठी ठाकरेंकडून मतांची पेरणी, आशिष शेलारांचा आरोप

राजकीय स्वार्थासाठी ठाकरेंकडून मतांची पेरणी, आशिष शेलारांचा आरोप

Subscribe

दिनांक २२ ऑक्टोबरला सामनामध्ये आपण सर्वांनी एक बातमी बघितली असेल किंवा वाचली असेल. अतिशय हुशारीने मुखपत्राच्या मुखपृष्ठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लिमांचं समर्थन आणि काही लोकांचे फोटो अशी बातमी झळकली. कोणी कोणाला समर्थन द्यावे आणि घ्यावे तो त्यांच्यातल्या पक्षाचा प्रश्न आहे. खरंतरं स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा एक नवीन विचार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हळुवारपणे त्याठिकाणी मांडला आहे, असा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी केलेली एक राजकीय पेरणी

- Advertisement -

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या विचारांमध्ये आणि समर्थनामध्ये लांगून चालनाचा एक स्वार्थीय वास आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी केलेली एक राजकीय पेरणी आहे. मराठी आणि मुस्लिम पण राजकीय हुशारीमुळे आणि थेट बोलण्याची हिंमत नसल्यामुळे मराठी मुस्लिम असा शब्द वापरण्यात आला. ही भिती आम्ही का मांडत आहोत, कारण ही विचारधारा पसरवण्याचं काम त्यांच्या मित्रपरिवारांनी सुरू केलं आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

मराठी मतांना भुलवणे, मुस्लिम मतांना फसवण्याचा प्रयत्न 

- Advertisement -

विधानसभेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत मराठी आणि मुस्लिम मतं किती?, मराठी+मुस्लिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, या संदर्भातील गणिताचा प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे हीच ती वेळ आहे. कारण हे गणित तुम्ही मुंबईकरांसमोर मांडत नाहीयेत. त्यामुळे आम्ही थेट त्यांच्यासमोर मांडणार आहोत. हा सर्व प्रयत्न मराठी मतांना भुलवणे आणि मुस्लिम मतांना फसवण्याचा आहे, असं शेलार म्हणाले.

धर्म-समाज आणि धर्म-जात याची पेरणी का करताय?

जी शिवसेना तुम्ही पाहिली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जातीपाती धर्माच्या विरहीत राजकारण करून मतांची बांधणी आणि आखणी केली. आज उद्धव ठाकरेंना जाती आणि धर्मांवर मतं मागण्याची वेळ का आली ही पेरणी करण्याची गरज का पडली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा केला आहे. परंतु तुम्ही पोटनिवडणुकीत देखील गेलात आणि कम्युनिस्ट पक्षासोबत सुद्धा तुम्ही समर्थन मागितलं. पण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्यावर तुम्ही समाजाच्या विभागण्या का करताय?, धर्म-समाज आणि धर्म-जात याची पेरणी का करताय, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ‘ना जात पर ना धर्म पर किये हुये विकास के काम पर’ आम्ही मतांची पेरणी करू, असं शेलार म्हणाले.

मराठी-हिंदु विषयाला फारकत का घेत आहात?

मराठी-मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुम्हाला वैर का?, मराठी-गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता, मराठी-उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत, मराठी-मुस्लिम तुम्हाला चालतो त्याची तुम्ही पेरणी करता, तर मग मराठी-हिंदु या विषयाला फारकत का घेत आहात?, केवळ मतांसाठी ना मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, असं आशिष शेलार उद्धव ठाकरेंना म्हणाले.


हेही वाचा : राष्ट्रवादीने जर सरकार पाडलं नसतं तर.., पृथ्वीराज चव्हाणांचा टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -