Homeमहाराष्ट्रMarathi Film Festival : सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन, मंत्री...

Marathi Film Festival : सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन, मंत्री शेलारांची घोषणा

Subscribe

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. आज मंगळवारी (ता. 28 जानेवारी) पत्रकार परिषद घेत शेलारांनी ही घोषणा केली.

मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. आज मंगळवारी (ता. 28 जानेवारी) पत्रकार परिषद घेत शेलारांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर 60 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या 60 वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Ashish Shelar announcement that government will organize an International Marathi film festival)

राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना 10 लाखापासून 04 कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. मात्र शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी मांडली. त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल.

हेही वाचा… Saba Pataudi : सैफच्या फास्ट रिकव्हरीवर शंका घेणाऱ्यांना अभिनेत्याच्या बहिणीने दिलं सडेतोड उत्तर

तसेच, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमनियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे, असे यावेळी मंत्री शेलार यांच्याकडून सांगण्यात आले.

सन 2022 या वर्षातील 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मेन, समायरा, गाभ ह्या गोष्टीला नावच नाही. ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या 10 चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी(फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण 50 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर,विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.