घरताज्या घडामोडीमविआला "डोस" मिळेलच पण जनतेने वेळेत बूस्टर डोस घ्यावा, आशिष शेलारांचा खोचक...

मविआला “डोस” मिळेलच पण जनतेने वेळेत बूस्टर डोस घ्यावा, आशिष शेलारांचा खोचक टोला

Subscribe

राज्यात सभांचा राजकीय धडाका होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा होणार आहे. तर भाजपची १ मे रोजी मुंबईत बूस्टर डोस सभा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामांबाबत हा डोस असणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला १ मे रोजी बूस्टर डोस देतील असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बूस्टर डोस लवकरात लवकर घ्यावा, महाविकास आघाडीला बूस्टर डोस देण्याची आमची तयारी सुरु आहे. महाराष्ट्र दिनी संध्याकाळी मविआ सरकारला बूस्टर डोस देऊ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजपने महाविकास आघाडीला बूस्टर डोस देणारी सभा आयोजित केली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर भाजपची सभा होणार आहे. सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असून भाजपचे नेते मंडळी या सभेला उपस्थित असतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून चांगलाच बूस्टर डोस देणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सभा चांगलीच चर्चेस आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत सभेची वेळ ठरली असल्याची माहिती दिली आहे. १ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता सौमय्या मैदानावर ही सभा होणार आहे. भ्रष्टाचारी ठाकरे सरकारला चांगलाच डोस देण्यात येईल असे शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने “बुस्टर डोस” वेळीच घेतला पाहिजे… केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत. बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो “डोस” देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय. महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा “डोस” मिळेलच!, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या…पावसाच्या तोंडावर मुंबईकरांना सोडून फरार झालेल्या.. आम्ही हिशोब विचारतो म्हणून दगड मारणाऱ्या… दाऊदच्या संबंधात तुरुंगवासी मंत्र्यांचे “नवाब” करणाऱ्या सरकारला आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार “डोस”, वेळ ठरली..१ मे संध्या. ५ वाजता, अशा आशयाचे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपाच्या पोलखोल सभांवर अती “विराट”म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला “डोस” देणारी ही सभा असेल असा इशारा आमदार अँड आशिष शेलार दिला आहे. १ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार असून भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा : Bhavana Gawali : भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स, चौकशीला न आल्यास ED कारवाई करणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -