घरताज्या घडामोडी'मी त्यांच्या भाषेत उत्तर दिल्यास त्यांना झोंबेल', आशिष शेलारांचा महापौर पेडणेकरांवर पलटवार

‘मी त्यांच्या भाषेत उत्तर दिल्यास त्यांना झोंबेल’, आशिष शेलारांचा महापौर पेडणेकरांवर पलटवार

Subscribe

भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात जुंपली आहे. भ्रष्टाचारांच्या आरोप प्रत्यारोपांवरुन शेलार आणि पेडणेकर यांच्यात वाद सुरु झाला आहे. पेडणेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर निजल्या होत्या का असे वक्तव्य शेलारांनी केले होते. यावर शेलार कोविड काळात अंगाई गात होते का? असा सवाल पेडणेकर यांनी शेलारांना केला आहे. तसेच शेलारांनी केवळ भौ भौ करु नये असा टोला देखील पेडणेकरांना लगावला आहे. यावर आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर पलटवार केला आहे. शेलार म्हणाले की, मी आता त्यांच्या भाषेत उत्तर दिलं तर त्यांना झोंबेल तुम्ही मला भौ भौ म्हणा, गुंड म्हणा, उद्विग्न म्हणा, वाळित टाकलेले म्हणा तुमच्या बोलण्याला मी बधणार नाही कारण मी मुंबईकरांची बाजू मांडतो आहे. जी जी विशेषणं लावाल त्यातून हे दिसेल की, मुंबईकरांच्या बाबतीत तुम्ही असंवेदनशील प्रतिक्रिया देत आहात असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

पेडणेकर यांनी शेलारांकडे पराव्याची मागणी केली होती. यावर शेलार म्हणाले की, पुराव्यांची माहिती माझ्याकडे मागण्यापेक्षा महापौर कार्यालयात जरा सजगता आणली तर मुंबईकरांना जास्त उपयोग होईल. म्युन्सिपल चीफ नावाचे एक पद असते एमसीएकडे सीएजी काही पत्र पाठवत असतात. हे जर महापौरांना माहिती असेल, जर नसेल माहिती तर त्यांनी माहिती करुन घ्यावी आणि त्यांच्याकडून माहिती मिळवण्याची व्यवस्था जरुर करावी. पुरावे त्यांच्या दरवाजात आहेत डोळ्यासमोर बघण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांना दिसतील असा खोचक टोला शेलार यांनी पेडणेकरांना लगावला आहे.

कुठलंही आक्षेपार्ह विधान केलं नाही

महापौरांविरोधात कुठलेही आक्षेपार्ह विधान केलं नाही. ना कुठल्या महिलांबद्दल ना महापौरांबद्दल माजी पूर्ण पत्रकार परिषद न पाहता त्यांना कुठेच काही मिळत नाही ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे शेलार म्हणाले. सार्वजनिक आयुष्यात नितीमुल्य पाळणारा मी माणूस आहे. शिवसेनेसारखा पाखंडी खोटं आणि अपप्रचार या भाजपच्या भूमिका नव्हे आणि जर कुठे तक्रार केली असेल तर नक्की चौकशी करावी स्वागत आहे. सत्य समोर येईल परंतु माझी महापौरांना विनंती आहे की, जे मी बोललो नाही तेच तुमच्या पक्षातील आणि तुम्हाला समर्थन आहे. असे दाखवणारे तु्मच्या नावाने सोशल मीडियावर थेट तुमच्या नावाने लिहितात त्यांच्यापासून तरी वाचले पाहिजे वाचवले पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोस्टल रोड प्रकरणात अवास्तव बिलं’ खर्चाचा हिशोब महानगरपालिकेनं द्यावा, शेलारांची मागणी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -