महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकाला मान्यता मिळाल्याने मुंबईतील धोकादायक व उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आज भाजपा नेते आशिष शेलार यांमी देवेंद्र फडणवीसांचे आणि शिंदे-फडणवीस सरकाराचे मुंबईकरांच्यावतीने व मुंबईतील भाडेकरुंच्यावतीने आभार मानले आहेत. तसेच सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. अशी प्रतिक्रिया शेलारांनी दिली आहे. शेलार आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेलार म्हणाले की, संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मुंबईकरांचा आणि विशेषत: भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले आहेत का?
महाविकास आघाडीला त्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता. तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. तत्कालीन प्रश्नावर आजही ठाम आहे. त्यावेळी उद्धवजी नी त्यांना क्लीन चिट का दिली? डोक्यावर पडल्यासारखे काँग्रेसने प्रश्न विचारू नये जुन्या व्हिडिओ क्लिपवर प्रश्न विचारायचे असतील तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठल्या भागाला लकवा लागला होता याचाही व्हिडिओ काढेन मी,काँग्रेसने शिवसेनेला हा वाघ नाही मांजर आहे असं म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे, जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल. अशा इशाराही शेलारांनी दिला आहे.
राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत
राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत. ते साफ चुकीचे बोलले आहेत. आम्ही स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरसुद्धा काही पक्ष याचा बाऊ आणि राजकारण करत आहेत. उरला प्रश्न छत्रपती उदयन राजे यांच्याविषयी, ते तर आमचे राजे आहेत. आंदोनल करण्याचा तसेच आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. असं म्हणत त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत असल्याची भूमिका मांडली आहे.
तेव्हा का प्रश्न सोडवला नाही
संजय राऊत यांना करायचे काहीच नाही. रोज गरम हवा सोडायची आहे. त्यांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवावेत. सत्तेत असताना संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न का सोडवला नाही. सत्तेत असताना भवन का नाही बांधले? त्यामुळे केवळ तोंडाची गरम वाफ बाहेर काढून यातून राज्याचे भले होईल हा त्यांचा गैरसमज आहे, असा टोलाही त्यांना राऊतांना लगावला आहे.