घरताज्या घडामोडी'जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो', नवरात्रोत्सवावरुन शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो’, नवरात्रोत्सवावरुन शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Subscribe

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवीच्या मुर्तीच्या उंचीबाबत आणि उत्सावाच्या नियमावली बाबत विनंती करून सुद्धा राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. यामुळे हजारो मुर्तीकार चिंतेत असल्याचे आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

नेमके आशिष शेलार ट्विटमध्ये काय म्हणाले?

‘नवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहेत. राज्य सरकारला विनंती करुनही अद्याप देवीच्या मुर्तीची उंची आणि उत्सवाच्या नियमावली बाबत सरकार काहीच निर्णय घेत नसल्याने राज्यातील हजारो मुर्तीकार चिंतेत आहेत. अशाच विलंबाचा फटका गणेश मुर्तीकारांना बसला होता. जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो!!, असे गाऱ्हाणे आशिष शेलार ट्विटमधून घातले आहे. यंदा कोरोनामुळे गणेश हजारो मुर्तिकारांना फटका बसला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकाराने गणेश मंडळाला ४ फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याचे नियम घालून दिल्यानेही मूर्तिकारांना फटका बसला.

- Advertisement -

यंदा कोरोनामुळे गणेश हजारो मुर्तिकारांना फटका बसला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री गणेशाच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत असावी, असा निर्णय जाहीर केला होता. यामुळे देखील मूर्तिकारांना मोठा फटका बसला. गणेशोत्सव काळात कुठेही गर्दी करू नये असेही आवाहन करण्यात आले होते. अवघे काही दिवस नवरात्रीला बाकी आहेत. तरीही अजून राज्य सरकारने देवीच्या उंचीबाबत आणि उत्सवाबाबत कोणतेही नियम जाहीर केले नाही आहेत.


हेही वाचा – मनसेचा उद्या लोकल प्रवास; जनहितासाठी कायदेभंग आंदोलन करणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -