घरताज्या घडामोडी'नेतृत्व कोण करणार हे आधी ठरवा' नंतर मोदींविरुद्ध उभं राहा, भाजपची ममता-...

‘नेतृत्व कोण करणार हे आधी ठरवा’ नंतर मोदींविरुद्ध उभं राहा, भाजपची ममता- पवार भेटीवर टोलेबाजी

Subscribe

नेतृत्व कोण करणार हे आधी ठरवा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभं राहा असा पलटवार भाजप नेते आशिष शेलार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. देशात भाजपला हरवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष तयार करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तर ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसविरहीत ही अघाडी असेल यावर मात्र पवार आणि ममता यांच्यामध्ये दुमत आहे. यावरुनच आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देशात तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी देखील ममतांच्या सुरात सूर मिसळला आहे. भाजपविरोधात सक्षम आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचे पवारही म्हणाले आहेत. मात्र यामध्ये काँग्रेसचा समावेश असणार का असा प्रश्न कऱण्यात आला यावर जे मैदानात उतरुन लढतील त्यांना सोबत घेणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्या दरम्यान ममता बॅनर्जी यांना नेतृत्वाचा प्रश्न विचारण्यात आला परंतु पवारांनी मध्येच भाजपविरोधात सक्षम आघाडी निर्माण करण्याची सध्या गरज असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

शरद पवारांनी नेतृत्वावरुन भाजपविरोधात सध्या आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. याचाच धागा पकडत भाजप आमदार आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे. आधी भाजपविरोधात नेतृत्व कोण करणार हे ठरवा नंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभं राहा असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. जे स्वतःच नकारात्मक आणि पराभूत वृत्तीमध्ये आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्याचे वक्तव्य करु नये. जे दुबळे आहेत, जे कमजोर आहेत त्यांनी दुसऱ्याच्याविरोधात लढण्यामध्ये हुशारकी मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे शेलार म्हणाले.

लोकशाहीमध्ये निवडणूका येतील तुम्ही या… समोर निवडणुकांना एकटे या.. नका येऊ मुळामध्ये युपीए संपली म्हणजे काँग्रेस ममता बॅनर्जी यांनी विसर्जित केली आहे का? काँग्रेसला हे मान्य आहे का? काँग्रेसबद्दल अशी भूमिका शिवसेनेच्या समर्थनात घेतली आहे का? त्यांना हे सांगावे लागेल असेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे – नाना पटोले


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -