घरताज्या घडामोडीसत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज - आशिष शेलार

सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज – आशिष शेलार

Subscribe

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकलेल्या छगन भुजबळांबरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचीच शुद्धीकरण करण्याची गरज

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन नारायण राणेंनी घेतल्यामुळे शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलंय यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकणाऱ्यांसोबत सत्तेची सलगी केली आहे. यामुळे शिवसेनं बाळासाहेबांच्या विचारानं शुद्धीकरण करावं असा सल्लाही आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांच्या शुद्धीकरणारवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेला शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अस्तित्व आणि अधिष्ठाण आहे का? हा प्रश्न आहे. याचं कारण सत्तेच्या लालसेपोटी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेस बरोबर लसगी केली त्या शिवसेनेची मुळात शुद्धीकरण करण्याची जनतेची मागणी असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी पुढे म्हटलं आहे की, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकलेल्या छगन भुजबळांबरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचीच शुद्धीकरण करण्याची गरज झाली आहे. यामुळे शिवसेनेने या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाची नौटंकी करु नये स्वतःच्या पक्षाचे शुद्धीकरण बाळासाहेबांच्या विचारांच्या नावाने प्रेरणेने करुन घ्यावे असा सल्लाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांचे आशिर्वाद माझ्या डोक्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्याप्रति भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की, साहेब आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलं आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी असच यश मिळव, माझा आशीर्वाद आहे असे म्हणत डोक्यावर हात ठेवला असता मात्र हात नसला तरी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.


हेही वाचा : सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज – आशिष शेलार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -