घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या पर्यावरणाविषयी मोठ्या जाहिराती पण झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष, आशिष शेलारांची टीका

आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणाविषयी मोठ्या जाहिराती पण झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष, आशिष शेलारांची टीका

Subscribe

राष्ट्वादीचे आंदोलन लबाडा घरचे जेवण आहे. राष्ट्रवादीला खरच झाडांवर प्रेम असेल तर चिपको आंदोलन करण्यापेक्षा ज्या सत्ताधाऱ्यांनी झाडांचा खून करण्याचे ठरवलं त्यांना जे चिपकलेत तिथून राष्ट्रवादीने बाहेर पडावे तरच त्यांच्या भूमिकेचे समर्थन होऊ शकते.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. नवी मुंबईत पुलाच्या कामासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याविरोधात भाजपने आंदोलन केले होते. यावेळी भाजप आमदार आशिष शेलारसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या आणि पर्यावरणंत्री आदित्य ठाकेरच्या पर्यावरणावरील बेगडी प्रेमाची पोलखोल केली आहे. एका बाजूला आरे वाचवतात आणि दुसऱ्या बाजूला सर्रास झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मोठ्या जाहिराती देत आहेत पण झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नवी मुंबईत शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. नवीमुंबईत गणेश नाईक यांच्या नेतृत्वात कोपरी उड्डाण पुलासाठी कापली जाणारी झाडे वाचविण्यासाठी आंदोलन छेडले गेले,या आंदोलनात भाजप आमदार आशीष शेलार सामील झाले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. पालिकेच्या कारभारात सत्ताधारी हस्तक्षेप करत असून,करोडोंची कामे रेटली जात आहेत. मुंबई प्रमाणे नवी मुंबईत पोल खोल सुरू असून,वर्तमान पत्रात आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणाविषयी मोठ्या जाहिराती छापून येत आहेत. पण जिथे झाडांची कत्तल होते त्याकडे लक्ष दिले जात नाहीत तर राष्ट्रवादी याच ठिकाणी आंदोलन करत आहे. ते त्यांचे बेगडी आंदोलन असून आधी सत्ताधाऱ्यांना समजावा आपणही सत्तेत आहात त्यामुळे हे फसवे आंनदोल करून जनतेची दिशाभूल करू नका असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या सरकराचा गोरखधंदा

पर्यावऱण दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण पानाच्या जाहिराती या सरकारने दिल्या आहेत. पर्यावऱण खात्याने जाहिराती दिल्या आहेत. त्यांच्या सगळ्या गोष्टी जाहिरातीमधल्या आणि प्रत्यक्षात सरकारचे वागणे यामध्ये तफावत आहे. एलईडी बल्बचा उल्लेख केला आहे. पाच वर्षांपूर्वी मरीन ड्राईव्हला एलईडी बल्ब लावले त्याला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे तुमची युवासेना होती. नवी मुंबईत ४०० झाडे आणि मुंबईत १६ हजार झाडे कापली यामध्ये तुमच्या बोलण्याला तथ्य काय राहिले आहे. आरे दाखवायची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावावर कंत्राटदाराकड़ून कारे घ्यायची हा गोरखधंदा आदित्य ठाकरेंचे सरकार करत आहे. शिवसेनेने मूक गिळून गप्प बसण्याचे ठरवलं आहे कारण भ्रष्टाचाराच्या लाडून शिवसेनेचे तोंड भरुन गेले आहे. त्यामुळे तोंड उघडायला भ्रष्टाचाराच्या लाडून जागाच ठेवली नाही. यामुळे शिवसेना गप्प आहे.

नवी मुंबईला लुटण्याचा कार्यक्रम ठाकरे सरकारचा

पूलासाठी नवी मुंबईत ४०० झाडांची कत्तल झाली आहे. हा पर्यावरणाचा खून आहे. पर्यावरणाच्या दिवशी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. याचा आम्हाला खेद आहे. ठाकरे सरकारला आमचा इशारा आहे. बोगस आणि तकलादू प्रेम दाखवणं बंद करा आरेच्या नावावर मेट्रोच्या विकास बंद करायचा आणि पुलाच्या नावावर नवी मुंबईतील ४०० झाडे तोडायची ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आहे. नवी मुंबईला लुटण्याचा कार्यक्रम ठाकरे सरकारने केला आहे. इथला भूखंड लूटले जात आहेत. मोक्याच्या जागेवर प्रकल्प आणल्याचे भासवले जात आहे. प्रकल्पाचे आणण्याचे काम शासकाचे आहे तर प्रशासकाचे नाही. प्रशासकाच्या नावाने लुटण्याचे षडयंत्र आहे.

- Advertisement -

राष्ट्वादीचे आंदोलन लबाडा घरचे जेवण

राष्ट्वादीचे आंदोलन लबाडा घरचे जेवण आहे. राष्ट्रवादीला खरच झाडांवर प्रेम असेल तर चिपको आंदोलन करण्यापेक्षा ज्या सत्ताधाऱ्यांनी झाडांचा खून करण्याचे ठरवलं त्यांना जे चिपकलेत तिथून राष्ट्रवादीने बाहेर पडावे तरच त्यांच्या भूमिकेचे समर्थन होऊ शकते. सत्तेला चिपको आणि झाडांबद्दल दुटप्पीपणा हे जनता मान्य करणार नाही.


हेही वाचा : धोका वाढला! विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -