घरताज्या घडामोडीसत्ताधाऱ्यांना मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, नालेसफाईवरुन आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, नालेसफाईवरुन आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

Subscribe

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मुंबईत नालेसफाई केली जाते. परंतु यंदा अद्याप नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी कंत्राट मंजूर केले नाही. सत्ताधाऱ्यांची मुदत संपल्याने आता ही प्रक्रिया प्रलंबित राहणार आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना नाले तुंबल्यावर पाण्यातून वाट काढावी लागते. यंदाही मुंबईची तुंबई होणार आहे. जरी नालेसफाईचे काम दिले तरी अवघ्या दीड महिन्यात नाले सफाई कशी होणार? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. नाले सफाईवरुन आशिष शेलार यांनी नेहमीच मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नालेसफाईतील भ्रष्टाचार शेलारांनी उघडकीस आणत कोट्यवधींचा घोटाळा कंत्राटदारासोबत मिळून केल्याचा आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी असल्याची टीका शेलारांनी केली.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत पुन्हा महानगरपालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी पुन्हा नालेसफाईवरुन पालिकेला घेरलं आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे 375 कि. मी.चे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. 7 मार्चला स्थायी समितीत 160 कोटीचा प्रस्ताव आला, पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. मुदत संपली आणि मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार झाले आहेत. का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅंडिंग बाकी होते का? असा प्रश्न शेलारांनी केला आहे. हे असले कारभारी यांना मुंबईकरांपेक्षा स्वतःच्या मालमत्तांची चिंता भारी असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

जंगले जळली पण ठाकरे सरकार सुशोभीकरणात व्यस्त

महाराष्ट्रात उन्हाचे तापमान वाढले आहे. अनेक कारणांमुळे जंगलातील आगीच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील जंगले जळत आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये 3,580 जंगलात आग लागली आहे. फक्त मार्च महिन्यात 17 हजार 514 जंगलांमध्ये आग लागली आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५० कोटी रुपये खर्चून पवाई तलावाचे सुशोभीकरण करण्यास व्यस्त आहेत. पेंग्विन प्राणी संग्रहालयासाठी १०० कोटींची निविदा काढण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड, फडणवीसांविरोधात केली होती याचिका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -