घरताज्या घडामोडीकोळीवाडे आणि गावठाणातील घरांचा मालमत्ता कर माफ करा, आशिष शेलारांची मागणी

कोळीवाडे आणि गावठाणातील घरांचा मालमत्ता कर माफ करा, आशिष शेलारांची मागणी

Subscribe

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांप्रमाणे मूळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण, कोळीवाड्यातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपतर्फे दोन दिवसांची स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.

मुंबईत ८४ हुन अधिक गावठाण आणि कोळीवाडे

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत ८४ हुन अधिक गावठाण आणि कोळीवाडे आहेत. यासाठी स्वतंत्र डिसीआर नसल्याने त्यांंचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. या मूळ मुंबईकरांची जुनी बैठी घरे असून त्यांचे क्षेत्रफळ ५०० फुटांंपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय घोषित केला त्या निर्णयाचा फायदा या गावठाण आणि कोळीवाड्यांतील घरांना होणार नाही, असे शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत

एकिकडे कोस्टल रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे यासारख्या प्रकल्पांंमुळे या कोळीबांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठी चक्रीवादळे आली, त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याला सरकार मदत करु शकले नाही. तर निसर्गातील बदलांमुळे त्यांचा एकूण मासेमारी व्यवसाय अडचणीत असताना सरकारकडून डिझेल परतावाही वेळेत मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहे, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

या मूळ मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आशीष शेलार यांनी कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करण्याची मागणी राज्य सरकारला पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND vs SA : तू अपरिपक्व… विराटच्या ‘त्या’ वर्तवणूकीवर गौतम गंभीर भडकला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -