Homeमहाराष्ट्रAshish Shelar : आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती..., ठाकरे गटावर आशिष...

Ashish Shelar : आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती…, ठाकरे गटावर आशिष शेलारांचा निशाणा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील रामलीला मैदानात काल, रविवारी इंडि आघाडीची रॅली झाली. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: सांगलीची जागा काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे चर्चेस तयार, तिढा सुटणार

एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक झाले आहे. एक व्यक्ती आणि एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घालवून आम्हाला सशक्त आणि मजबूत देश निर्माण करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इंडि आघाडी सरकारला सत्तेत आणावेच लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले होते.

देशात विविध राज्य, प्रांत आणि प्रदेश आहेत. त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणारे सरकार आम्हाला पाहिजे. या देशातील सर्व राज्ये विविधतेने नटलेले आहेत. त्या राज्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले तरच, देश वाचणार आहे. नाही तर मग जनतेने ठरवायचे आहे की, त्यांना त्यांचे भविष्य कोणाच्या हातात द्यायचे आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

हेही वाचा – Modi VS Raut : मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रार करणार; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका

या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे. ठाकरे गटाचा गल्लीत ‘गोंधळ’ आणि दिल्लीत काँग्रेस समोर ‘मुजरा’ सुरू आहे, असे सांगत त्यांनी प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील काही समर्पक शेर सादर केले आहेत.

अखेर अपुला कसाबसा ते तंबू टाकून आले
त्याच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले!
वावटळींच्या मागे मागे जे जे धावत होते
घरी परतले तेव्हा नुसती वाळू घेऊन आले
समजत नाही, या लोकांना भूक लागली कसली
हवेत गेले, हवा शिजवली हवाच खाऊन आले
आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती
शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले!

हेही वाचा – Thackeray Group : हा तर राजकीय कर दहशतवाद; उद्धव गटाचा हल्लाबोल