घरताज्या घडामोडीअधिवेशनात मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरणार, आशिष शेलार यांची माहिती

अधिवेशनात मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरणार, आशिष शेलार यांची माहिती

Subscribe

राज्य सरकारने यापेक्षा छोटं अधिवेशन करता येणार नाही म्हणू दोन दिवसांचे अधिवेशन ठेवलं

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांनी उत्तरे मिळवण्यासाठी भाजपची बैठक घेण्यात आली. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील प्रश्न आणि मराठा आरक्षण, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आल्याची शक्यता आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते मराठा आरक्षण, कोरोना परिस्थितीवरुन घेरणार असल्याचा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजपची बैठक पुर्ण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. यावेळी शेलार यांनी म्हटलंय राज्यासमोर अतिशय महत्त्वाचे बरेच प्रश्न असताना संपुर्ण अधिवेशन झालं असतं तर जनहितार्थ नाव देता आलं असतं. परंतु सरकारने यापेक्षा छोटं अधिवेशन करता येणार नाही म्हणू दोन दिवसांचे अधिवेशन ठेवलं आहे. या दोन दिवसांमध्ये परिणामकारकसुद्धा शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यवस्था कोविडबाबत प्रश्न सर्व विषयाला न्याय देण्याचा संदर्भात रणनिती ठरवली आहे. या विषयावर संघटनेचे कार्यक्रम सुद्धा राज्यभर काय करावेत याबाबत विचार सुरु आहे. देगलूरला एक पोटनिवडणूक आली आहे. या निवडणूकीमध्ये भाजप पंढरपूरसारखा पुन्हा विजय मिळवण्याबाबतसुद्धा बैठक आणि रणनिती ठरवली आहे.

- Advertisement -

सत्ताधारी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत कार्यवाही होत आहे. सत्ताधारी पक्षांनी व्हिप जारी केला आहे. परंतु निवडणूक घेण्याचा कार्यक्रम नाही. निवडणूक घोषित करण्याची हिम्मत नाही. त्यामुळे अगोदर निवडणूक घोषित करावी असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटल आहे.

अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत बहुमत सिद्ध करु

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -