मुंबई : मुंबईत सध्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने सिमेंट काँक्रिट रस्ते कामांचे ऑडिट करावे आणि संबंधित कंत्राटदारांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. त्यांनी आज, शुक्रवारी (13 डिसेंबर) पालिका आयुक्त गगराणी यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी निवेदन देत वरीलप्रमाणे मागणी केली. (Ashish Shelar met Bhusham Gagrani regarding the issue of poor quality cement concrete roads)
वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोड या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम कंत्राटदाराने केले आहे. मात्र या रस्ते कामाची पाहणी केली असता त्या रस्त्याला तडे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप करीत ॲड. शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे करते. खड्डे मुक्त रस्ते निर्माण करण्यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र रस्ते बनविल्यानंतर सदर रस्त्यांना तडे जात असल्याने रस्ते कामांबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Debris On Call : ‘डेब्रिज ऑन कॉल’ या ऑनलाईन सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
आज मुंबई महापालिका आयुक्त मा. श्री. भूषण गगराणी यांची बी.एम.सी. ऑफिस येथे भेट घेतली.
यावेळी गेल्या वर्षभरापासून मुंबईत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते काँक्रीटीकरणाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असून यासाठी एक विशेष तपास पथक… pic.twitter.com/hajcWRtEDQ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 13, 2024
अगदी नव्याने बांधलेल्या रस्त्याला सुद्धा तडा गेला आहे. सिमेंट निघून खडी बाहेर पडून रस्ता पुन्हा खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशाच प्रकारे मुंबईत अन्य ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत आहेत का, कामांचे कॉलिटी ऑडिट करण्यात येते का याकडे लक्ष वेधीत आमदार ॲड. शेलार यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. तसेच सांताक्रुझ येथील कामांची चौकशी करा, अशी मागणी केली.
हेही वाचा – Road Accident : रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू कोणाचा? महिलांचा की पुरुषांचा?