Ashish Shelar On Raj Thackeray मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (30 जानेवारी) मुंबईतील वरळीच्या राष्ट्रीय क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर निशाणा साधला. विशेषत: राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा मुद्दा उपस्थित करत भाजपवरही निशाणा साधला. तसेच, भूमिका बदलावरून ही राज ठाकरेंनी विरोधकांना धारेवर धरलं. यावर आता भाजपचे मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. (Ashish Shelar On Raj Thackeray MNS Melava In Worli Mumbai News In Marathi)
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मनसेवर लोकसभा निवडणुकीपासून भूमिका बदलाचा आरोप होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्टता असली पाहिजे, असे सांगत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, शरद पवार आणि शिवसेना यांनीही परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याचं म्हटलं. मात्र त्यांनी निर्णय घेतले की ते परिस्थितीनुरुप निर्णय ठरता आणि राज ठाकरेने निर्णय घेतला की त्याला भूमिका बदलाचा शिक्का मारला जातो. त्यांनी केले ते प्रेम आणि आम्ही केलं की तो बलात्कार असे ते म्हणाले.
आशिष शेलारांच्या एक्स पोस्टमध्ये काय?
राष्ट्र प्रथम मानून राष्ट्रवादी विचारधारेचा राष्ट्रीय पक्ष म्हणून “राष्ट्रनिर्माण” चे काम करताना…
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही.
“एक देश एक निशान एक संविधान” असायला हवे म्हणून काश्मीर मधून 370 हटवण्याच्या विषयावर आम्ही कधीच तडजोड केली नाही.
काशी कॉरिडॉर, उज्जेन कॉरिडॉरच्या निर्माणात कधीच तडजोड केली नाही.
अंत्योदय आणि गरिब कल्याणाच्या ज्या भूमिका आणि योजना हाती घेतल्या त्यात तडजोड केली नाही.
एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत कधीच तडजोड केली नाही.. होणार नाही.
“पोखरण” असो वा एन. आर. सी, सी.ए.ए च्या विषयावर सुद्धा तडजोड केली नाही.
सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए, अशी भूमिका पण आम्ही घेतली.
आपल्या वैचारिक बांधिलकीशी कधीच तडजोड न करता..
वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकारे चालवताना जे तात्कालिक घडते, ज्याचा श्रीमान राज ठाकरे जो अर्थ लावून त्याचे सवंग “निरुपण” ते करु पाहत आहेत.
म्हणून सांगतो…राज ठाकरे जे नेरेटिव्ह सेट करु पाहत आहेत ते जनतेला पटतच नाही…म्हणूनच जनतेचे प्रचंड समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळते आहे, ते वाढतच जाते आहे. आपण जरा डोकावून पहा यात काही शिकण्यासारखे आहे का?
हेही वाचा – Raj Thackeray : टॅक्स भरला, विषय संपला; ईडीच्या नोटीसीबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा