घरमहाराष्ट्रAshish Shelar : पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर...

Ashish Shelar : पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर निशाणा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने ‘हात बदलेगा हालात’ असा दावा जाहिरातीद्वारे केला आहे. त्यासंदर्भात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत, पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, अशी टीका काँग्रेसवर केली आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : राजकरणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती…; आव्हाडांनी शेअर केले बाळासाहेबांचे पत्र

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील Adv. आशिष शेलार यांनी शरसंधान केले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी फटकारलेल्या काँग्रेसच्या जाळ्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे अडकले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार आशिष शेलार यांनी एक कविता शेअर केली आहे.

- Advertisement -

एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात…
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
बियर, व्हिस्की, वाईन पेग रिचवले…
आता यांचे पाय अडकले खोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले…
बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी ‘हाता’च्या गोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्ले…
देश केला उद्ध्वस्त भ्रष्टाचाराच्या या झोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी…
एकाच परिवाराचा ‘हात’ लुटमारीच्या या मेल्यात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
पक्ष कोमात, फक्त जाहिरात मात्र जोमात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

हेही वाचा – Thackeray group : मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -