घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे, फडणवीसांनंतर आशिष शेलारांचा राणेंना घरचा आहेर

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे, फडणवीसांनंतर आशिष शेलारांचा राणेंना घरचा आहेर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला बोलवण्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम नसल्याचे विधान नारायण राणे यांनी केलं होते. यामुळे राजकीय वातावरणं तापलं होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे अशे म्हटलं आहे. यामुळे नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा फारकत घेतली आहे. भले शिवसेनेच्या प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखला पाहिजे असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी नारायण राणेंच्या विधानाला शेलारांनी घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला बोलवण्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांनी म्हटलं आहे की, मी प्रोटोकॉल अधिकारी नाही. पण महाराष्ट्रातील नागरिक म्हणून मला वाटत आहे की, भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या सन्मान झाला पाहिजे यामुळे त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे असे मत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नारायण राणे काय म्हणाले होते?

केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना बोलवणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना करण्यात आला. यावर नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री कशाला हवेत? मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना बोलवले आहे. यामुळे मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री कशाला हवेत, चिपी विमानतळ उद्घाटनावरुन राणेंनी शिवसेनेला डिवचलं

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -