घरमहाराष्ट्रबाजीगरचा निर्माता शिवसेनेचे संजय राऊत; आशिष शेलारांचा थोरातांच्या 'त्या' विधानावर पलटवार

बाजीगरचा निर्माता शिवसेनेचे संजय राऊत; आशिष शेलारांचा थोरातांच्या ‘त्या’ विधानावर पलटवार

Subscribe

स्वत;च्या पक्षाबाबत संजय राऊत कधी तरी बोला, नेहमी दुसऱ्यावर बंदुक घेऊन काय चालता? त्यांच्या पक्षातील लोकचं बोलतात की आमचा संजय राऊतांवर विश्वास नाही, असा आरोपही आशिष शेलारांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदारांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्या बाजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही याची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी ही बनवाबनवी सुरु पण बाळासाहेब थोरातांनी आम्ही बाजीगार होऊन दाखवून असे म्हटले होते, यावर भाजप आमदार आशिष शेलारांनी पलटवार केला आहे. “बाजीगर कसे? शिवसेनेला दोन मत न देता, स्वत: पळवल्याने बाजीगर? त्यांच्या बाजीगरचा निर्माता शिवसेनेचे संजय राऊत आहेत, पाहिजे तर त्यांना विचारा,” अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

“आमच्यासोबत असताना शिवसेनेला अशी वागणूक कधीच मिळाली नाही”

“महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच चालू आहे. भागमभाग चालू आहे. पळवापळवी चालू आहे, वाटमारी चालू आहे अशा पद्धतीचे चित्र आहे. हे एकमेकांचा विश्वास संपादन करु शकत नाही तर महाराष्ट्राचा विश्वास संपादन काय करणार आहेत? त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण जे चित्र समोर येत आहे त्यावरून स्पष्ट आहे की, राज्यसभेत नाना पटोलेंच्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल, आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची मत पळवत आहे आणि शिवसेना आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवत आहे. राजकीय अर्थाचं बोलायचं नाही पण थोडं शिवसेना नेतृत्त्वाने जास्ती नाही काही वर्षांपूर्वीची आठवण काढली तर लक्षात येईल की, ते आमच्यासोबत होते तेव्हा त्यांना अशी वागणूक कधीच मिळाली नव्हती,” अस आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

“शिवसेनेतील लोकांनाच संजय राऊतांवर विश्वास नाही”

“स्वत;च्या पक्षाबाबत संजय राऊत कधी तरी बोला, नेहमी दुसऱ्यावर बंदुक घेऊन काय चालता? त्यांच्या पक्षातील लोकचं बोलतात की आमचा संजय राऊतांवर विश्वास नाही”, असा आरोपही आशिष शेलारांनी केला आहे.


श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -