घरताज्या घडामोडीनारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात, आशिष शेलारांकडून सीबीआय चौकशीची मागणी

नारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात, आशिष शेलारांकडून सीबीआय चौकशीची मागणी

Subscribe

अनिल परब यांनी राणेंच्या अटक प्रकरणात हस्तक्षेप आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. या अटकेमागी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा हात आहे असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. अनिल परब यांच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे हे लक्षात येतंय की, अनिल परब कसे गृहखात्यात हस्तक्षेप करतात. राणेंच्या अटकेचं प्रकरण संशयास्पद आहे. जामिन अर्ज फेटाळण्यात येणार हे मंत्र्यांना निवाडा होण्यापुर्वीच कसं काय माहिती यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आशिष शिलार यांनी केली आहे. राणेंच्या अटकेमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा किती दबाव आहे हे समोर आलं असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नारायण राणेंच्या अटक प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा हस्तक्षेप आहे. यामुळे त्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, न्यायालयात निवाडा होण्यापुर्वीच राणेंचा अटकपुर्व जामीन नाकारण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. यामुळे अनिल परब असे कसं सांगू शकतात. त्यांना याबाबत कोणी माहिती दिली आहे. परब यांनी राणेंच्या अटक प्रकरणात हस्तक्षेप आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारने याबाबत उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राणेंच्या अटकेमध्ये गोष्टी स्पष्ट

आयपीएस अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव किती आहे. अनिल परब हे गृहमंत्री नाहीत यामुळे शरद पवार यांनी नाराजगी व्यक्त केली असल्याचे वाचले आहेत. गृहखात्यात अनिल परब हस्तक्षेप करत आहेत. अँटीसिपेटरी बेल अर्ज साडेचार वाजता करण्यात आला त्यापुर्वीच मंत्री म्हणतात हा अर्ज फेटाळण्यात येणार आहे. अँटीसिपेटरी बेल अर्ज साडेचार वाजता करण्यात आला त्यापुर्वीच मंत्री म्हणतात हा अर्ज फेटाळण्यात येणार आहे. असे अनिल परब आधीच सांगत आहेत. याचा अर्थ दललांमार्फत न्याय निवाड्यात हस्तक्षेप करत असल्याचा प्रयत्न अनिल परब करत आहेत ही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या उल्लेख आहे. याचा अर्थ न्यायालयाचा बदनामी करण्याचा प्रकार आहे.

सीबीआय चौकशीची वेळ आली

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचे एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना नारायण राणेंची अटक होण्यापुर्वीच अटकेबाबत कोर्टात ते नाकारण्यात येईल असा निवाडा घोषित करतात. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहेत. यामध्ये आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये काय बोलणं झालं. निवाडा होण्यापुर्वीच निकाल जाहीर करण्याची राज्याची मंत्र्यांची भूमिका ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे या सगळ्या प्रकरणची सीबीआय चौकशी होण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय चौकशी करण्याची वेळ आली आहे. असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेना विरुद्ध राणे, वादाचा दुसरा अंक सुरू; मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप करणार तक्रार दाखल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -