घरताज्या घडामोडीमोदींनी एकमेव पर्याय म्हणून लॉकडाऊन घोषित केला होता, आशिष शेलारांचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

मोदींनी एकमेव पर्याय म्हणून लॉकडाऊन घोषित केला होता, आशिष शेलारांचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

Subscribe

आम्ही लॉकडाऊनला विरोध करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा आहे

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. वाढत्या कोरोनाससंर्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यावाचून पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र भाजपकडून लॉकडाऊनला कडाडून विरोध करण्यात आला आहे. मोदींनी लॉकडाऊन केल्यास विरोधकांची भूमिका काय असेल असा प्रश्नही शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपलॉकडाऊनला विरोध ही करीत नाही,कारण जनतेचा जीव महत्वाचा आहेस्थित केला होता. तसेच काही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या लॉकडाऊनबाबत वक्तव्य केले होते. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी लॉकडाऊनबाबत कोणाताही संकेत दिला नव्हता, यावरुन राज्यात मोदींनी केलेल्या लॉकडाऊनवरुन सत्ताधारी नेत्यांकडून टीका केली जात आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता त्यावेळी आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

- Advertisement -

- Advertisement -

आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुषार” सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही,कारण जनतेचा जीव महत्वाचा आहे. मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला, आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत..रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार तेव्हा पंतप्रधान मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना? असा प्रश्नही भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -