घरताज्या घडामोडीठाकरे सरकार बिनकामाचे होते, आता ते हळूहळू बिनखांबाचे ठरणार, आशिष शेलारांचा घणाघात

ठाकरे सरकार बिनकामाचे होते, आता ते हळूहळू बिनखांबाचे ठरणार, आशिष शेलारांचा घणाघात

Subscribe

तिघाडीच्या किल्ल्याचे बुरुज फोडून त्याच्या किल्ल्यातील "मतांचा खजाना" मिळवून गनिमी काव्याने ठाकरे सरकारला खिंडीत पकडण्याची भाजपाची विजयाची रणनीती यशस्वी झाली. छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ!" असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपमधील नेते महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असताना भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला तर शिवसेनाचा उमेदवार पराभूत झाला आहे. फडणवीसांच्या खेळीमुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नाराज असल्यामुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार बिनकामाचे होते. आते ते हळूहळू बिनखांबाचे ठरणार असा इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या गर्वाच्या ढाच्याला हादरे बसले अशा शब्दात टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या तिघाडीच्या बुरुजाला फोडून विजय मिळवला असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा राज्यसभा निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर भाजप आमदारांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसुख घेतलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे संजय पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

- Advertisement -

आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, भाजपाचे राज्यसभेतील विजयी उमेदवार पियुष गोयल, डाँ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे अभिनंदन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय झाला असून त्यांचे अभिनंदन शेलार यांनी केलं आहे. जनाधार आणि जनमताच्या विरोधात जाऊन अनैसर्गिकपणे आलेल्या ठाकरे सरकारला आता आमदारांनी ही फटकारले आहे. हे वाचाळ तिघाडीच्या गर्वाच्या “ढाचाला” हादरेच आहेत. ठाकरे सरकार बिनकामाचे होते, आता ते हळूहळू बिनखांबाचे ठरणार अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान आशिष शेलार यांनी तिघाडी सरकारला चांगलेच फटकारले आहे. “शांत, सयंमाने पक्के नियोजन करुन, तिघाडीच्या किल्ल्याचे बुरुज फोडून त्याच्या किल्ल्यातील “मतांचा खजाना” मिळवून गनिमी काव्याने ठाकरे सरकारला खिंडीत पकडण्याची भाजपाची विजयाची रणनीती यशस्वी झाली. छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ!” असे आशिष शेलार म्हणाले आहेत.


हेही वाचा : भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -