घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला - आशिष शेलार

महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला – आशिष शेलार

Subscribe

नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करु नका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजपकडून कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. या कार्यकमानुसार १० ते १२ प्रमुख नेत्यांना राज्यातील वेगववेगळ्या जिल्ह्याला भेट देत आहेत. यामध्ये भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार हे बीड आणि नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रालीत महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भाजपच्या वतीने मराठा आरक्षणाविषयात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीत समाजाच्या भावना तीव्र आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताला महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. सगळ्या कु कृत्याचे रेकॉर्ड तोडले आहेत. सर्वार्थाने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. गुन्हेगारी संदर्भातसुद्धा महिलांच्या ते बालगुन्हापर्यंत असंख्य उदाहणे देता येतील. जंम्बो किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये माहिलांवर झालेले अत्याचार याचे सुद्धा दुर्दैवाने रेकॉर्ड मोडले आहेत. गुन्हेगारी जगतामध्ये विविध प्रकारचे खून असतात. काही अचानक खून, काही सूडभावनेने केले, काही उद्देशहीन असतात, परंतु यामध्ये सर्वात खतरनाक खून असतो तो म्हणजे कोल्ड ब्लडेड खून आहे. कोल्ड ब्लडेड पद्धतीने केलेला खून फार भयंकर असतो ज्या खुनाची पुर्वतयारी असते परंतु दिसत नाही. पुर्ण तयारी झालेली असते परंतु ती कळत नाही. या खुणाचा आरोपी समोर असतो पण तो गोंडस दिसतो अशा पद्धतीने कोल्ड ब्लडेड मर्डर होत असतात.

- Advertisement -

महाराष्ट्र विकास आघाडीने एका मराठा समाजाच्या हिताचा असा कोल्ड ब्लडेडे खून केला आहे. मुडदा पाडला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. कालेलकर आयोग ज्यावेळी निर्माण झाला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार केला परंतु रिपोर्ट टेबलच निर्माण केला नाही. पुर्वतयारी तेव्हापासूनच झाली होती. मंडल आयोगाच्या वेळीही संधी घेता येऊ शकली असती पण मराठा समाजाला ते नाकारले पुर्ण तयारीच्या दिशेला तेव्हापासून सुरु झाले. बापट आयोग आणि खरे आयोग यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले सरकार यांचे होते कालेलकर आयोग मंडल आयोग इकडचे तिकडे झाले असतील परंतु बापट आयोग खरे आयोगावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी एकच होती. आज गळे काढणारे त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण नाकारत होते असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाचा ठरवून खून

पहिले आयोगाने नाकारले, गोंडस चेहऱ्याने आयोगाने जो नाकारलेला रिपोर्ट दिला तोही नाकारला नाही याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचे आयोग आले त्या रिपोर्टच्या फायंडिंगला नाकारण्याचे कामसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले नाही. यानंतर राणे समिती आली राणेंच्या हातात प्रकरण देताना ते टिकणार नाही असे करुनच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. कारण आयोग आणि समिती याच्यात मुलभूत अधिकार आहेत. आयोग नेमला तर मराठा आरक्षण टिकेल यासाठी समिती नेमली आणि म्हणून अशा पद्धतीने एक-एक करत मराठा समाजाच्या हिताला आणि त्याचे खून करण्याचे काम सरकारमध्ये असलेल्यांनी यांनी ठरवून केला आहे.

- Advertisement -

नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करु नका

आम्हाला शिकवणाऱ्यांना सांगू इच्छितो की नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करु नका याचे कारण तुमचे प्रयत्न अजूनही मराठा समजाला त्यांच्या हितापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. ज्या गायकवाड आयोगाने स्वतःचा अहवाल बनवला परिशिष्ट आणि जोडपत्रासहित ते मुंबई उच्च न्यायालयात टिकला फडणवीस सरकारने दिलेला मराठ्यांचे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले ते सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तत्कालिन चीफ जस्टिस यांनी त्याला स्थगितीचा अर्ज आणि मागणी केल्यावर सुद्धा स्थगिती दिली नाही. तीन बेंचसमोर पाठवले परंतु राज्य सराकरने हाताने घालवले आहे. म्हणुन मराठा आरक्षणाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड मर्डर ठाकरे सरकारने केला असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

जे आयोगाने म्हटले आहे ते तरी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवायचे होते परंतु तेही ठेवले नाही. जी परिशिष्ट आणि जोडपत्र होती ती किमान मराठीतली इंग्रजी करुन कोर्टाला दाखवण्याचा प्रयत्न करायला हवा होता की हा अहवाल सर्वस्पर्शी आहे. आरक्षणविरोधी लोकांचे सुद्धा ऐकून त्यावर सुनावणी करुन आदेश दिले आहेत सर्वसमावेशक विचार करुन केला आहे. ते ही केले नाही. रणनिती पहिल्या दिवसापासून चुकली आहे. इंदिरा सहानीचे जजमेंट चुकीचे असल्याचे म्हटले किमान समान कार्यक्रमातील तीन पक्षांना बुद्धी हवी होती की ९ जजेसच्या बेंचने दिलेले आदेश ३ बेंच बदलू शकतात का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -