घरताज्या घडामोडीकेंद्राचे प्राधान्य सर्वांसाठी घरे मात्र ठाकरे सरकारचे सर्वांसाठी वाईन, रेडी रेकनर वाढीवरुन...

केंद्राचे प्राधान्य सर्वांसाठी घरे मात्र ठाकरे सरकारचे सर्वांसाठी वाईन, रेडी रेकनर वाढीवरुन शेलारांची टीका

Subscribe

रेडी रेकनरच्या दरातवाढ केल्यामुळे नव्या वर्षात घर खरेदी महागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने रेडी रेकनरच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ केली आहेत. हे दर आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. याचा भाजपकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे याला प्राधान्य दिले आहे परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी वाईन याला प्राधान्य दिलं आहे. याला आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. आधीच त्रासलेल्या नागरिकांसाठी घरे घेणं महागणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीने रेडीरेकरच्या दरात वाढ केल्यामुळे टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकारने गृह खरेदीमध्ये नागरिकांना दिलासा द्यायला हवा होता पंरतु मद्यविक्रीमध्ये दिलासा दिला आहे. यावरुन आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शेलारांनी ट्विट करत म्हटलं आहे की, रेडी रेकनर दरात सरासरी ५% वाढ करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाला विरोध, यामुळे आधीच त्रासलेल्या महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी घरे महाग होतील असे आशिष शेलार म्हणाले. त्यासोबत त्यांनी केंद्र सरकारचे प्राधान्य सर्वांसाठी घरे तर ठाकरे सरकारचे प्राधान्य सर्वांसाठी वाईन अशी टीका ठाकरे सरकारवर केली आहे.

- Advertisement -

रेडी रेकनरच्या दरात ५ टक्क्यांची वाढ

महाविकास आघाडी सरकारने १ एप्रिल २०२२ पासून लागू होणारे नवीन रेडी रेकनरचे दर जाहीर केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्षात रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले नव्हते. यामुळे यंदा सरासरी ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार ग्रामीण भागात ६.९६ टक्क्यांची वाढ लागू होईल. नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ झाली आहे. तर महापालिका क्षेत्रात ८.८० टक्क्याची वाढ मुंबईला वगळून करण्यात आली आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील सरासरी वाढ २.३४ टक्के आहे.

- Advertisement -

मेट्रो सेसमुळे मुद्रांक शुल्क ६ टक्क्यांवर

नव्या रेडीरेकनर दरासह राज्यात काही मोजक्या आणि महत्त्वाच्या शहरात घर खरेदी करणं महागणार आहे. गृहखरेदीदारांना आता मालमत्ता खरेदी- विक्रीच्या व्यवहारात १ टक्क् मेट्रो सेस म्हणजेच उपकर भरावा लागणार आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांतील घरं महागणार आहेत. मुंबईत मुद्रांक शुल्क ५ टक्क्यांऐवजी ६ टक्क्यांवर गेले आहे. तर ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये 7 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल. खरेदी करताना १ टक्के मेट्रो सेसमधून मिळणारा निधी विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे.


हेही वाचा : द कश्मीर फाईल्सच्या माध्यमातून देशात द्वेष भावना पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न, शरद पवारांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -