घरताज्या घडामोडीठाकरे सरकार गुड गोइंग, पेंग्विन देखभालीसाठी १६ कोटी अन् शेतकऱ्यांना २० रुपये...

ठाकरे सरकार गुड गोइंग, पेंग्विन देखभालीसाठी १६ कोटी अन् शेतकऱ्यांना २० रुपये मदत, शेलारांची टीका

Subscribe

राज्यात एका पाठोपाठ ३ चक्रीवादळांमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीसाठी निधीची तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झाडांच्या बदल्यात प्रत्येकी २० रुपयांची तुटपुंजी मदत करण्यात आली आहे. तर समुद्राच्या लाटांच्या तडाक्यात क्षतीग्रस्त झालेल्या बोटींच्या बदल्यात वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या असल्याची खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. शेतकऱ्यांना तोकडी मदत करुन पेंग्विनसाठी १६ कोटी रुपये दिल्यावरुन भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. वादळात आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याची ठाकरे सरकारने घोषणा केली होती. परंतु वादळात नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी २० रुपये एवढी प्रचंड मदत केली. तर मुंबईसह कोकणातील मच्छिमारांच्या बोटी फुटल्या त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने भायखळ्यातील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या देखभालीसाठी प्रस्तावात भरघोस, वाढ करुन तब्बल १६ कोटी रुपये दिले आहेत. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यात आली आहे. यामुळे भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. सोमवारी भाजपने पालिकेच्या प्रत्यक्ष होणाऱ्या सभेमध्ये गोंधळ केला होता. पेंग्विनच्या देखभालीसाठी केलेल्या खर्चावरुन भाजपने निदर्शनं दाखवली.

- Advertisement -

शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

राज्यात मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. वादळामुळे शेतकऱ्यांची झाडे आणि बागा जमीनदोस्त झाली आहेत. या शेतकऱ्यांचे प्रचंड नकुसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरगोस मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्येकी २० रुपये झाडांचे नुकसान देण्यात आले आहे. मुंबई, पालघर आणि कोकणातील मच्छीमारांच्या बोटी फुटल्या आहेत. या मच्छीमार बांधवांना मदत करण्याची मागणी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु त्या मच्छीमार बांधवांना अद्याप मदत करण्यात आली नसल्यामुळे आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.


हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीचा फडणवीसांना पश्चाताप, म्हणाले जशास तसे उत्तर…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -