घरताज्या घडामोडी"मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणता" हल्ली शिव्यांपुरतेच ते मराठीपण जपतात, आशिष शेलारांचा...

“मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणता” हल्ली शिव्यांपुरतेच ते मराठीपण जपतात, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

Subscribe

गेल्या ५ वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावर अधिक काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

हल्ली शिव्यांपुरतेच मराठीपण जपतात असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर केला आहे. मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात फक्त हल्ली शिव्यांपुरतेच मराठीपण जपतात असा काव्यात्मक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे. अनेक कार्यक्रम राजकीय पक्षांकडून आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आयोजित केले आहेत. दरम्यान भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत शेलार म्हणाले की, गेल्या ५ वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावर अधिक काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर टीका केली आहे. सावरकरांचे विस्मरण,गणेशोत्सवावर बंदी,अन् ईद मुबारकवाल्यांची मात्र चांदी….अभंग विसरुन कव्वाली ऐकू लागले, टाळ-मृदंगा ऐवजी ढोलंक वाजवू लागले…दाऊदच्या समर्थकांचे गोडवे गातात, उठता बसता हल्ली बिर्याणीच हाणतात…मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच “ते” मराठीपण जपतात! असं काव्यात्मक अंदाजात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आशिष शेलार म्हणाले की, मराठी भाषेला दर्जा देण्याबाबत गेल्या २५ वर्षात जे काम झाले नाही तेवढ काम गेल्या ५ वर्षात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा : नवाब मलिकांची ड्रग्ज टेस्ट केल्यास तब्येत बिघडण्याचे खरं कारण समजेल, मोहित कंबोज यांचा टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -