घरमहाराष्ट्रशिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर उपहासात्मक कविता

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर उपहासात्मक कविता

Subscribe

शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील वैर आणखी वाढलं आहे. या दोन्ही पक्षांमधून टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच भाजपाकडून नेहमीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खिल्ली उडवली जाते. आजही आशिष शेलार यांनी कविता करून तिन्ही पक्षांवर निशाणा साधला. 

मुंबई – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जातेय. भारज जोडोच्या पहिल्या दिवसांपासून भाजपाने राहुल गांधींवर निशाणा साधलाय. तर, शिवसेनेचा दसरा मेळावाच हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा दोन्ही संदर्भ एकत्र करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला असं म्हणत आशिष शेलारांनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे.

आशिष शेलार यांनी आज ट्विटरवर एक उपहासात्मक कविता पोस्ट केली आहे. या कवितेत त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षावर उपहास केलाय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा यशस्वी करायला शिवसेना मदत करतेय, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस सरसावली आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

काँग्रेसच्या भारत जोडोला
पेग्विंन सेनेची साथ
दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी
काँग्रेस देणार हात

सगळा गोंधळ घालून
घड्याळ बघा कसे नामानिराळे
संसार तिघांचा
प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले

- Advertisement -

काय तो भारत जोडो
काय तो पेग्विन सेनेचा दसरा
शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला
हातच्या कंकणाला आरसा कशाला?
सगळं कसं ओकेमध्ये आहे!

अशी कविता आशिष शेलार यांनी पोस्ट करत महाविकास आघाडीवर टीका केली. शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील वैर आणखी वाढलं आहे. या दोन्ही पक्षांमधून टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच भाजपाकडून नेहमीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खिल्ली उडवली जाते. आजही आशिष शेलार यांनी कविता करून तिन्ही पक्षांवर निशाणा साधला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -