उघड मतदानाने बावचळले तर विधान परिषदेत गुप्त मतदानात काय करणार?, आशिष शेलारांचा टोला

तर्विरोधाचा तिन तिघाडा किती दिवस झाकणार? भाजप नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा असा सल्ला आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

Ashish shelar warn mahavikas aghadi government on MLC election
उघड मतदानाने बावचळले तर विधान परिषदेत गुप्त मतदानात काय करणार?, आशिष शेलारांचा टोला

राज्यसभेच्या निवडणुकीत उघड पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे चित्र समोर आल्यानंतर महाविकास आघाडी बावचाळली आहे. मग येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी काय करणार असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे ठाकरे सरकारमध्ये असंतोष असल्याचे चव्हाट्यावर आला अशी टीकासुद्धा भाजपकडून करण्यात येत आहे.

आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं शिवसेनाला मदत केली नाही. भाजपकडे ११३ मतांचा कोटा असताना १२३ मत कशी आणि कुठून आली? असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक होती. तसेच नेत्याची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर? MIM ची मते घेऊन औरंगजेबी युती अखेर केलीच, आता औरंगाबाद नामांतराचे काय? असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मत घेताना ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला?

राज्यसभा निवडणुकीमध्ये सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला? आता सांगा कुणाची बी टिम? महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो हा प्रताप आता महाराष्ट्र बघतो आहे. उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत मग विधानपरिषद निवडणूक गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. अंतर्विरोधाचा तिन तिघाडा किती दिवस झाकणार? भाजप नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा असा सल्ला आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.


हेही वाचा : महाविकास आघाडीतील असंतोष संजय राऊतांना भोवला, दरेकरांचा राऊतांच्या क्रमांकावरुन घणाघात