है तयार हम, मुंबईकरांच्या विजयासाठी भ्रष्टाचाराला हरवणार, शेलारांचा शिवसेनेला इशारा

सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाही.

Ashish Shelar said that MNS supported BJP in Rajya Sabha elections

मुबई महापालिका निवडणुकीपूर्वी वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे काही राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. ओबीसी आरक्षण महापालिका आरक्षण जाहीर केलं असल तरी आम्ही ओबीसींसोबत आहे. ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते डगमगणार नाही असे वक्तव्य भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे. ओबीसींच्या न्यायासाठी आम्ही याचा पाठपुरावा करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन सत्ताधारी आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार असून भ्रष्टाचाराला हरवणार असल्याचा इशारा शेलारांनी दिला आहे. ओबीसींना वगळून महापालिका आरक्षण जाहीर करण्यात आले परंतु आम्ही ओबीसीसोबत आहे. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाही. प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! भ्रष्टाचाराला हरवणार! आणि “है तयार हम!” अशा आशयाचे ट्विट करुन शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात अशी भूमिका भाजपची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाची लढाई न्यायालयात लढण्यामध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरल्यामुळे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. परंतु ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिचे असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : HSC, SSC Board Result 2022 : पुढील आठवड्यात 12 वी, तर शेवटच्या आठवड्यात 10 वी चा निकाल