घरताज्या घडामोडीआमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर खबरदार, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर खबरदार, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

Subscribe

मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालत्ता कर माफ केला. पण आमच्या मुंबईचे मूळ रहिवाशी असलेल्या कोळी बांधवांना हक्काचे घर मिळावे, कोळीवाड्यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी मात्र स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली केली नाहीत. मात्र आता कोस्टल रोडच्या निमित्ताने मूळ मुंबईकर, आगरी, कोळी बांधवांचे उच्चाटन करायला निघाला आहात? समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर खबरदार, असा इशारा भाजपचे नेते आमदार आशीष शेलार यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला.

मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या बहुचर्चित कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. हा रस्ता वरळी भागात असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरुन जाणार असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध केला आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्याती मच्छीमार गेले दोन महिने आंदोलन करत आहेत. वरळी कोळीवाडय़ातील मच्छीमारांनी वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोड यांच्या जोडणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी आज ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुंबईचा मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांना हक्काचे घर मिळावे, कोळीवाडे, गावठाणांचा पुनर्विकास व्हावा म्हणून स्वतंत्र डिसीआर केला नाही. ५०० चौ.फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला, पण त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही. चक्रीवादळात त्यांना मदत केली नाहीत, असे शेलार यांनी नमूद केले आहे.

समुद्राचे पाणी गोडे करुन मूळ मुंबईकर आगरी,कोळी बांधवांचे समूळ उच्चाटन तुम्ही करणार? कोस्टल रोडसाठी बैठकांचे नाटक करुन स्वतःचेच खरे करायला निघालात काय? समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार असे शेलार यांनी बजावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MS Dhoni Gifts : पाकिस्तानी क्रिकेटपटूला धोनीने दिलं मोठं गिफ्ट, शेअर केली भावनिक पोस्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -