घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्या टिप्पणीवरून आशीष शेलारांना लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचे स्मरण

संजय राऊत यांच्या टिप्पणीवरून आशीष शेलारांना लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचे स्मरण

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने हा न्यायनिवाडा नाही. यात तब्बल 2 हजार कोटींचा सौदा झाला असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना लोकमान्य टिळकांच्या ‘आधी कोणते राजकीय की सामाजिक’ या अग्रलेखाचे स्मरण झाले.

येत्या काही महिन्यांत मुंबईसह विविध महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने धक्कादायकच ठरला आहे. शिवाय, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या दृष्टीने शिंदे गटाचे पारडे जड करणारा हा निर्णय आहे. म्हणूनच शिंदे गट तसेच भाजपाकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले तर, ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “माझी खात्रीची माहिती आहे…. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेतील ओळीही त्यांनी पोस्ट केल्या आहेत. “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!,’ असे म्हणत राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी याचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

भाजपा आमदारा आशिष शेलार यांनी ट्वीटरवरून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अग्रलेखाचा दाखला देत खासदार संजय राऊत यांच्या या टिप्पणीचा समाचार घेतला आहे. लोकमान्य टिळकांनी केसरीतील ‘आधी कोणते राजकीय की सामाजिक’ या अग्रलेखात म्हटले आहे की, “विचारशक्तीस अनावर सोडून जे जे तरंग निघतील ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात काही विशेष फरक आहे, असे आम्ही मानत नाही.” रोज सकाळी टीव्हीवर वेगवेगळे हावभाव करून बोलणाऱ्या एका गृहस्थास महाराष्ट्र पाहू लागला की, लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राचा सकाळचा ताजा अनुभवही असाच होता, अशी बोचरी टीका आशिष शेलार यानी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -