घरमहाराष्ट्रमुंबईतील नालेसफाईचे आकडे हे "रतन खत्रीचे" आकडे, आशिष शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबईतील नालेसफाईचे आकडे हे “रतन खत्रीचे” आकडे, आशिष शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र

Subscribe

मुंबईकर हो, हे तुम्हाला तरी पटतंय का?, तुम्ही समाधानी आहात का?, हा दंड दिखाऊपणा असल्यासारखे वाटतंय का?, सत्ताधारी पक्ष फरार आहे हे तुम्ही पाहताय ना?", असं म्हणत आशिष शेलारांनी निशाणा साधलाय. 

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत असते. मात्र यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामांवरून जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी नगरसेवकांच्या टीकेनंतर आता पालिका प्रशासननंही खडबडून जागे झाले असून, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोमात सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील काही नद्या, मोठ्या नाल्यांमधील सफाई कामांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्व डेब्रिज हटविणे, रस्त्यांची कामे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि नालेसफाईची कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात पालिका प्रशासनाला दिले होते. पण या पालिकेच्या सफासफाईचं कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांकडून भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आलीत. त्यावरूनच आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलारांनी ट्विट करत शिवसेना आणि पालिका प्रशासनावर हल्लाबोल केलाय.  जवळपास मुंबई महापालिका 25 वर्षे शिवसेना सत्तेत आहे, त्यावरूनच आता आशिष शेलारांनी ट्टिट करत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “नालेसफाईचे कंत्राट 160 कोटीचे, सफाईचे दावे 96% चे. त्यातच दिरंगाई केली म्हणून 3 कंत्राटदारांना दंड केवळ 3 लाख 5 हजारांचा ठोठावला. मुंबईकर हो, हे तुम्हाला तरी पटतंय का?, तुम्ही समाधानी आहात का?, हा दंड दिखाऊपणा असल्यासारखे वाटतंय का?, सत्ताधारी पक्ष फरार आहे हे तुम्ही पाहताय ना?”, असं म्हणत आशिष शेलारांनी निशाणा साधलाय.

- Advertisement -

तसेच मुंबईतील नालेसफाईचे आकडे हे बोगस असल्याचंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय. मुंबईतील नालेसफाईचे आकडे हे “रतन खत्रीचे” आकडे आहेत, सालाबादप्रमाणे हातसफाई सुरु आहे, न झालेल्या कामाचे फोटो भाजपाचे नगरसेवक, आमदार, पदाधिकारी वारंवार प्रशासनाकडे पाठवतोय. आता मुंबईकर हो तुम्हीही आपापल्या परिसरातील परिस्थिती आक्रमकपणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवा!,” असंही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

आशिष शेलारांच्या मते, एप्रिल महिन्यापर्यंत पालिकेने नालेसफाईचे कंत्राट दिले नव्हते. भाजपने जेव्हा नालेसफाईचा मुद्दा पुढे केला, त्यानंतर पालिकेने सफाईचे काम हाती घेतले. भाजपने नालेसफाईच्या कामाची दोन वेळा पाहणी करून अहवाल मांडला मात्र, महाविकास आघाडीने या कामाची पाहणी केली नाही, असंही आशिष शेलार म्हणाले होते.

नालेसफाईची 162 कोटींची कामे
यंदा नालेसफाई कामांसाठी मोठ्या नाल्यांकरिता कोटींच्या 6 निविदा मंजूर करण्यात आल्या, तर लहान नाल्यांमधील सफाई कामांसाठी 91 कोटी रुपयांच्या 11 निविदांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शहरी भागासाठी 1, पूर्व उपनगरांसाठी 1 तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी 1 निविदा आहेत. लहान व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी एकूण 162 कोटींची कंत्राटी कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शहर विभागात 30 हजार 142 मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये 73 हजार 443 मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 48 हजार 25 मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे.


हेही वाचाः नालेसफाईत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला अवघा साडेतीन लाखांचा दंड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -