घरमहाराष्ट्रAshok Chavan : अशोक चव्हाण यांचा आजच भाजपा प्रवेश; चर्चेला उधाण

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा आजच भाजपा प्रवेश; चर्चेला उधाण

Subscribe

अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. ‘येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेन’, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांना दिली होती. यानंतर आज अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा – Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण हे 15 फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने आज दुपारी गांधी भवन येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thakceray : काय अशोकराव जागे आहात की झोपलात? उद्धव ठाकरेंचा मिश्कील टोला

काँग्रेसला रामराम

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळांहून असलेली काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महिन्याभरात महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. याआधी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी हे 4 ते 5 दशकांपासून काँग्रेससोबतच होते. ज्या नेत्यांनी काँग्रेस उभारण्यास सिंहाचा वाटा उचलला, त्यांनीच काँग्रेसचा हात सोडला. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -