घरमहाराष्ट्रAshok Chavan: अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; म्हणाले, ही नवी सुरुवात

Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; म्हणाले, ही नवी सुरुवात

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर, आज अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. पक्षप्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, भाजपात प्रवेश करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, ही माझी नवीन सुरुवात आहे. (Ashok Chavan Ashok Chavan s entry into BJP Giving the reason for joining the party he said this is my new beginning)

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपाची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेन. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही. मला जे काही सांगितलं जाईल, ते मी प्रामाणिकपणे करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच, मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी मला अनेकदा सहकार्य केलं आहे. भाजपात येण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक आहे,असं ते म्हणाले.

- Advertisement -

अशोक चव्हाण म्हणाले की, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असताना राजकारणाच्या पलिकडेही एकमेकांना साथ दिली. आता आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. 30 वर्षांच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे, भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करणार आहे.

देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी…

देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे, यासाठी मी आलो आहे. मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम करत राहिलो आहे. विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपामध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेन. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहोत. आम्ही विरोधात असतानाही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे. आजपासून पुढे आता आम्ही एकत्र काम करू, असं अशोक चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा:Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; महायुतीला बळ मिळेल – देवेंद्र फडणवीस)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -